संत चोखा सागर जलाशयातून सिंचनासाठी त्वरित पाणी सोडा : खेडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:33 AM2021-04-06T04:33:10+5:302021-04-06T04:33:10+5:30
रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका, कांदा, बाजरी, ज्वारी, भुईमूग आदी पिकांची लागवड केली. निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप हंगामातील पिकांना ...
रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका, कांदा, बाजरी, ज्वारी, भुईमूग आदी पिकांची लागवड केली. निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सोयाबीन, कपाशी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची आशा ही रब्बी पिकांवर होती. परंतु रब्बी हंगामातही अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचे नुकसान झाले. प्रकल्पाच्या पाण्याने आतापर्यंत जिवंत असलेली पिके आता करपू लागल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. बळिराजासाठी आशेचा किरण असणाऱ्या संत चोखासागर (खडकपूर्णा) प्रकल्प आहे. त्यामुळे खरीप हंगाम गेला, आता रब्बी हंगामातील पिकेदेखील हातची जाणार असल्याने डाव्या व उजव्या कालव्याच्या माध्यमातून त्वरित पिकांना पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
अनेक वर्षांनंतर संत चोखा सागर प्रकल्प १०० टक्के भरला आहे. त्यामुळे परिसरात हरितक्रांतीचे स्वप्न अनेक शेतकऱ्यांनी यंदा उराशी बाळगले होते. प्रकल्पाचे पाणी शेतात येईल, त्यामुळे उत्पादन वाढेल, या आशेने मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. परंतु पाणी सोडण्याबाबत अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवतात. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी न्याय कोणाला मागायचा.
डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार, देऊळगाव राजा.