पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:23 AM2021-07-11T04:23:51+5:302021-07-11T04:23:51+5:30
शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी देउळगाव राजा : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी जून महिन्यात झालेल्या पावसाच्या बळावर पेरणी केली. मात्र, त्यानंतर ...
शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी
देउळगाव राजा : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी जून महिन्यात झालेल्या पावसाच्या बळावर पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने दहा ते पंधरा दिवसांपासून दांडी मारल्याने पिके काेमेजत आहेत. त्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी हाेत आहे.
प्लास्टीकबंदीकडे दुर्लक्ष
सुलतानपूर : शासनाच्या प्लास्टीकच्या पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. मात्र, तरीही लाेणार शहरासह तालुक्यात सर्रास प्लास्टीक पिशव्यांचा वापर हाेत आहे. प्लास्टीकबंदीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.
जानेफळ येथे स्वतंत्र पाणीपुरवठा याेजना द्या
जानेफळ : जानेफळ व कळंबेश्वर अशी संयुक्त असलेली जुनी नळयोजना ही सद्यस्थितीत दोन्ही गावांतील वाढलेली लोकसंख्या व गावाचा वाढलेला विस्तार पाहता विभक्त करून देण्यात यावी, तसेच जानेफळ गावासाठी स्वतंत्र नळ योजना मंजूर करण्याची मागणी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी
सिंदखेडराजा : वादळी वाऱ्यासह झालेल्या धुंवाधार पावसामुळे तालुक्यातील एका शेतकऱ्याचे शेडनेट उडून गेल्यामुळे शेतकऱ्याचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा प्रयाेग करा
बुलडाणा : जुलै महिना सुरू झाला, तरी जिल्ह्यातील अनेक भागांत दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा प्रयाेग करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील गुड माॅर्निंग पथक गायब
बुलडाणा : ग्रामीण भागातील गुड माॅर्निंग पथके गायब झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे हागणदारीमुक्त गाव याेजनेला हरताळ फासला जात आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन गुड माॅर्निंग पथके सक्रिय करण्याची गरज आहे.