रेमडेसिवीरचे दर नियंत्रणात ठेवणार -शिंगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:35 AM2021-04-07T04:35:41+5:302021-04-07T04:35:41+5:30

कोविड संसर्ग नियंत्रणाबाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत ...

RemediSavir's rate will be kept under control | रेमडेसिवीरचे दर नियंत्रणात ठेवणार -शिंगणे

रेमडेसिवीरचे दर नियंत्रणात ठेवणार -शिंगणे

Next

कोविड संसर्ग नियंत्रणाबाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, अपर जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, सहायक आयुक्त (औषधे) अशोक बर्डे, औषध निरीक्षक गजानन घिरके, आदी उपस्थित होते. रेमडेसिवीर औषधाची एमआरपी कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी स्पष्ट केले. औषधाची एमआरपी कमी करण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे. त्यानुसार एमआरपी कमी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. कोरोनाची तपासणी बऱ्यापैकी होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. कोविडवर लसीकरण अत्यंत प्रभावी असून लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे. राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील सर्वांचे लसीकरण करून घ्यावे. लसीकरणाचा वेग बघता लसींचा पर्याप्त साठा ठेवावा. त्यानुसार विभागाने नियोजन करावे. स्त्री रुग्णालयात नवीन १०० बेडची व्यवस्था करण्यात यावी. क्षयआरोग्यधाम येथे आयसीयू युनिट तयार करावे. द्रवयुक्त ऑक्सिजनची मागणी नोंदवून परिस्थितीनुरूप द्रवयुक्त ऑक्सिजनचा साठाही पुरेसा करून ठेवावा, अशा सूचनाही पालकमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कोविडचा पॉझिटिव्हिटी दर, मृत्यूदर, लसीकरणाचे प्रमाण, ऑक्सिजनचा साठा व पुरवठा, रेमडेसिवीरचा साठा व पुरवठा आदींचा आढावा घेतला. यंत्रणांकडून अडचणी जाणून घेतल्या. बैठकीला संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: RemediSavir's rate will be kept under control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.