स्वच्छता न करताच काढले जाहिरात फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:12+5:302021-06-16T04:46:12+5:30

सध्या शहरात डॉ. आंबेडकर वाटिका ते जोहरमल दुकानपर्यंत रस्ता दुरुस्तीकरिता खोदून ठेवला आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. ते ...

Removed billboards without cleaning | स्वच्छता न करताच काढले जाहिरात फलक

स्वच्छता न करताच काढले जाहिरात फलक

Next

सध्या शहरात डॉ. आंबेडकर वाटिका ते जोहरमल दुकानपर्यंत रस्ता दुरुस्तीकरिता खोदून ठेवला आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. ते काढण्यासाठी न. प. कर्मचारी आले नाही. ते जाहिरात फलक काढत बसले. शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी कंत्राट दिला आहे. शनिवारी संबंधित कंत्राटदाराने शहरातील कचरा साफ न करता, ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याची विल्हेवाट न लावता दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहकर भेटीचे काँग्रेसने शहरात ठिकठिकाणी लावलेले जाहिरात फलक जमा करण्याचे काम केले. त्यामुळे शहरातील कचरा शनिवारी तसाच राहिला. नाली व कचरा साफ करण्यासाठी ट्रॅक्टर न आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी उपनगराध्यक्ष जयचंद बाठीया यांच्यासह शिवसेना नगरसेवकांनी केली आहे. या गंभीर बाबीकडे मुख्याधिकारी डोळेझाक करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Web Title: Removed billboards without cleaning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.