तंटामुक्त गाव समित्यांचे पुनर्गठन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:37 AM2017-08-15T00:37:17+5:302017-08-15T00:37:39+5:30
शेगाव: सन २0१७-१८ या वर्षासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम १५ ऑगस्ट २0१७ पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट ते ३0 ऑगस्ट या कालावधीत ग्रामपंचायतीनी ग्रामसभा घेऊन गाव समित्या पुनर्गठित कराव्यात, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक मीना यांनी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आयोजित ग्रामसभेमध्ये तंटामुक्त गाव समित्यांचे पुनर्गठन होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

गावपातळीवर छोट्या छोट्या कारणावरून निर्माण होणार्या तंट्यांचे पर्यवसान मोठय़ा तंट्यात होऊ नये, वादामध्ये मालमत्ता अडकून पडून त्यातून आर्थिक नुकसान होऊ नये, कुटुंबाची, समाजाची व गावाची शांतता धोक्यात येऊ नये, या दृष्टीने गावात तंटे निर्माण होणार नाहीत व अस्तित्वात असलेले तंटे लोकसहभागातून सामोपचाराने आणि आवश्यक तेथे प्रशासनाची मदत घेऊन सोडविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी या करिता महाराष्ट्र शासनाने १५ ऑगस्ट २00७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गावमोहीम सुरू केली आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, दाखल झालेले तंटे मिटविणे व नव्याने निर्माण होणारे तंटे मिटविणे अशा तीन भागांचा मोहिमेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या तीनही भागातील कार्यवाही व तंटे मिटविण्याची मोहीम ही लोकचळवळ म्हणून राबविली जावी, मोहिमेमध्ये दिवाणी, महसुली, फौजदारी व इतर तंट्यांचा समावेश करण्यात आला आहे. गावे तंटामुक्त झाली म्हणून मोहीम संपली असे नाही. यापुढेही मोहीम राबविण्याचे काम सातत्याने सुरूच राहणार आहे. तंटामुक्त गाव समिती कायमस्वरूपी कार्यरत राहील. तथापि, जे सदस्य समितीच्या बैठकांना उपस्थित राहत नसतील, कामकाजात अडथडा आणत असतील अशा सदस्यांना बदलून नवीन सदस्य घेण्याबाबत प्रत्येक वर्षाच्या १५ ऑगस्ट नंतरच्या पहिल्या ग्रामसभेमध्ये ग्रामसभेच्या मान्यतेने निर्णय घेता येईल.