लोणार सरोवर विकासावरील बैठकीचा अहवाल द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:14 AM2017-09-19T00:14:00+5:302017-09-19T00:14:29+5:30
नागपूर : बुलडाणा जिल्ह्णातील नैसर्गिक चमत्कार असलेल्या लोणार सरोवराच्या विकासावरील बैठकीचा अहवाल सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी लोणार सरोवर क्षती प्रतिबंध व संवर्धन समितीला दिला. त्यासाठी समितीला दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क

लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी सुधाकर बुगदाने, कीर्ती निपाणकर व गोविंद खेकाळे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
याचिकाकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी अर्ज दाखल करून लोणार सरोवराच्या संवर्धनावर केवळ चर्चा सुरू असल्याचा आरोप केला होता. लोणार सरोवरामध्ये सांडपाणी जाऊ नये यासाठी आवश्यक उपाय करण्यात आल्याचे नगर परिषदेचे म्हणणे आहे. परंतु, त्यावर नियमित नजर ठेवल्याशिवाय त्याचे फायदे मिळू शकणार नाहीत. सरोवराजवळच्या वस्तीचे अद्याप पुनर्वसन झाले नाही. यासंदर्भातील कार्यवाही अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
पाऊस कमी पडल्यामुळे सरोवरातील पाण्याची पातळी घटली आहे. सरोवरातील प्राचीन सासू-सुनेची विहीर बाहेरून दिसायला लागली आहे असेही अर्जात नमूद करण्यात आले होते. न्यायालयाने यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यासाठी समितीची बैठक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार गेल्या २६ आॅगस्ट रोजी समितीची बैठक झाली आहे.