लोणार सरोवर संवर्धनासाठी झटणारे संशोधक सुधाकर बुगदाने यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 11:50 PM2021-01-25T23:50:58+5:302021-01-25T23:52:13+5:30

Lonar News लोणार सरोवर संवर्धनासाठी झटणारे संशोधक सुधाकर बुगदाने यांचे निधन

Researcher Sudhakar Bugdane, who was working for the conservation of Lonar Lake, passed away | लोणार सरोवर संवर्धनासाठी झटणारे संशोधक सुधाकर बुगदाने यांचे निधन

लोणार सरोवर संवर्धनासाठी झटणारे संशोधक सुधाकर बुगदाने यांचे निधन

Next

बुलढाणा: लोणार सरोवर संदर्भातील संशोधक आणि सरोवराच्या संवर्धनासाठी सतत काम करणारे सुधाकर बुगदाने (75, रा. लोणार ) यांचे  25 जानेवारी रोजी रात्री 8.25 वाजता  दीर्घ आजाराने निधन झाले.  औरंगाबाद येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सुधाकर बुगदाने यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे  असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचा अंत्यविधी लोणार येथे 26 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे. लोणार येथील शिवाजी हायस्कूलचे माजी प्राचार्य असलेले सुधाकर बुगदाने यांनी वयाचे 45 वर्ष लोणार सरोवराच्या अस्तित्वासाठी खर्च केले. लोणार संवर्धनासाठी नागपूर खंडपीठात पहिली रिट याचिका बुगदाने यांनी दाखल केली होती. त्यामुळे लोणार सरोवराचे आज संवर्धन होऊ शकले. सरोवर संवर्धनामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.

Web Title: Researcher Sudhakar Bugdane, who was working for the conservation of Lonar Lake, passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.