६० ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:37 AM2021-02-05T08:37:08+5:302021-02-05T08:37:08+5:30
लाेणार : तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या सरंपचपदाचे २७ जानेवारी राेजी आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षणामुळे अनेकांना फटका बसला आहे. ...
लाेणार : तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या सरंपचपदाचे २७ जानेवारी राेजी आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षणामुळे अनेकांना फटका बसला आहे. अनुसूचित जातीसाठी ११ तर अनुसूचित जमातीसाठी दाेन, नामाप्रसाठी १६ तर सर्वसाधारणसाठी ३१ ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित झाले आहे.
यामध्ये अ.जाती-सावरगाव मुंढे, देऊळगाव कुंडपाळ, बिबखेड, मोहोतखेड, येवती, हत्ता, गांधारी, गोत्रा, पळसखेड, खुरमपुर, टिटवी. अ.जमाती- वझर आघाव, धाड, नामाप्र- सोमठाणा, गायखेड, हिरडव, आरडव, दाभा, बागुलखेड, रायगाव, भुमराठा, नांद्रा, पारडी, धानोरा, जांबूल, किन्ही, पिंपळखुटा, पार्डा (दराडे), पिंपळनेर.
सर्वसाधारण-शारा, वढव, कोयाळी, चोरपांग्रा, कारेगाव, मांडवा, वडगाव तेजन, चिंचोली सांगळे, गुंजखेड, महारचिकणा, शिवणी पिसा, पिंप्री खंदारे, खळेगाव, सरस्वती, भानापूर, सुलतानपूर, किनगाव जट्टू, हिवराखंड, पांग्राडोळे, अंजनी खुर्द, पहूर, चिखला, तांबोळा, ब्राम्हणचिकणा, सोनुना, गुंधा, सारगांव तेली, देऊळगाव वायसा, बिबी, वेणी, अजिसपूर.