मराठा व इतर बहुजन समाजासाठी आरक्षण गरजेचे - छत्रपती संभाजी राजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:21 AM2021-07-05T04:21:59+5:302021-07-05T04:21:59+5:30
यावेळी बोलताना युवराज छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, बहुजन समाज हा प्रगत व्हावा. त्यांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी ...
यावेळी बोलताना युवराज छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, बहुजन समाज हा प्रगत व्हावा. त्यांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी आपल्याला काय करता, याबाबतचा दौऱ्याच्या माध्यमातून आपण माहिती संकलित करीत आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. या जनसंवाद तथा सहविचार सभेसाठी अखील भारतीय छावा संघटनेचे प्रदेश संघटक अप्पासाहेब कुडेकर, छावा संघटनेचे संजय जाधव, संतोष राजे जाधव, तसेच हर्षवर्धन देशमुख, नंदन खेडेकर, प्रल्हाद देशमुख यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधासाठीच्या सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला.
--राजे जाधव परिवाराचे मोलाचे सहकार्य--
छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केले. त्यासाठी शहाजी महाराजांची संकल्पना पाठीशी होती आणि हे केवळ माॅ जिजाऊंच्या प्रेरणेने साध्य होऊ शकले. त्यामुळे राजमाता जिजाऊंच्या माहेरकडील राजे जाधव परिवाराचेही सहकार्य या जनसंपर्क दौऱ्याप्रसंगी भरीव स्वरुपात मिळाले, असे गौरवोद्गारही छत्रपती संभाजी राजे यांनी काढले.
--गडकिल्ले संवर्धनाचे काम महत्त्वपूर्ण--
अध्यक्षीय मनोगतात राजे विजयसिंह जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी मराठा समाजासह इतर समाजाच्या हितासाठी सुरू केलेला हा जनसंपर्क दौरा एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यास आमचा भक्कम पाठिंबा आहे, असे सांगितले. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे जे काम हाती घेतले आहे, ते खूप महत्त्वाचे आहे. वर्षभरापूर्वी मराठा सरदार परिषदेच्या निमित्ताने छत्रपती संभाजी राजेंसोबत ऑनलाइन संवाद साधता आला. या परिषदेच्या माध्यमातून मिळालेली प्रेरणा मला पुढील कार्यासाठी मदतीची ठरले, असेही ते म्हणाले.