आरक्षण महिलेचे, संधी मात्र पुरुषाला

By admin | Published: September 9, 2014 06:58 PM2014-09-09T18:58:59+5:302014-09-09T18:58:59+5:30

मेहकर : सभापतींचे भविष्य ईश्‍वर चिठ्ठीवर

Reservation of woman, only the man of chance | आरक्षण महिलेचे, संधी मात्र पुरुषाला

आरक्षण महिलेचे, संधी मात्र पुरुषाला

Next

मेहकर : येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक १४ सप्टेंबर रोजी होत असून, शिवसेना व काँग्रेस दोन्ही पक्षांकडे सहा-सहा सदस्य असल्याने अखेर इश्‍वरचिठ्ठीने ही निवड होणार आहे. मेहकर पंचायत समितीत एकूण १२ पंचायत समिती सदस्य आहेत. त्यात शिवसेनेचे ६ तर काँग्रेस पक्षाकडे ६ सदस्य आहेत. सध्या पंचायत समिती सभापती पदावर शिवसेनेच्या अंजली माळेकर व उपसभापती सेनेचे भगवान लहाने आहेत. १४ सप्टेंबर रोजी निवडण्यात येणार्‍या पंचायत समिती सभापती पद खुल्या प्रवर्गासाठी असून, दोन्ही पक्षाकडे प्रत्येकी ६ सदस्य असल्याने ईश्‍वर चिठ्ठीने या पदासाठी फैसला होणार आहे. शिवसेनेकडून सभापती पदासाठी सागर पाटील यांची तर काँग्रेस पक्षाकडून कमलताई विष्णूपंत पाखरे, निलोफर अजीम कुरेशी यांच्या नावांची चर्चा आहे. काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांकडून अद्यापपर्यंत या पदासाठी नाव जाहीर झाले नसले तरी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील, असे इच्छुक उमेदवारांनी सांगितले. १४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता पंचायत समितीच्या सभागृहामध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ईश्‍वरचिठ्ठी कोणाला साथ देते, याकडे पक्षाच्या लोकांचे लक्ष लागले आहे. याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Web Title: Reservation of woman, only the man of chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.