धरणांमधील जलसाठय़ात वाढ!
By admin | Published: September 29, 2016 01:38 AM2016-09-29T01:38:12+5:302016-09-29T01:38:12+5:30
नळगंगा, पेनटाकळी, खडकपुर्णा या मोठय़ा प्रकल्पामधील जलपातळीत वाढ झाली आहे.
बुलडाणा, दि. २८- शहरासह परिसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे परिसरातील नदी, नाल्यांना पूर येवून नळगंगा, पेनटाकळी, खडकपुर्णा या मोठय़ा प्रकल्पामधील जलपातळीत वाढ झाली आहे. योबतच मध्यम प्रकल्प असलेले येळगाव धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे भविष्यातील दोन वर्षाची पाणीटंचाईची चिंता मिटली आहे.
बुलडाणा शहर व परिसरातील काही गावांना येळगाव धरणातून पाण्याचा पुरवठा होतो. मागिल काही वर्षापासून कमी पावसामुळे येळगाव धरणात अल्प जलसाठा येत होता. त्यामुळे बुलडाणा शहरासह इतर गावांना उन्हाळ्यात तिव्र पाणीटंचाईच्या झळा बसत होत्या. बुलडाणा शहर व परिसरातील काही ग्रामीण भागात नगरपालिकेव्दारे ८0 हजार लोकसंख्येच्या वस्तीला पाणी पुरवठा करण्यात येतो. यासाठी शहर परिसरातील येळगाव धरणातून जलशुध्दीकरण केंद्र व या केंद्रातून शहरातील जलकुंभात पाणी येते. या जलकुंभातून शहर परिसरात दुसर्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र मागिल वर्षापासून परिस्थिती बदलली होती. मागिल वर्षी झालेल्या पावसामुळे धरण १00 टक्के भरले होते. त्यामुळे गेल्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवली नाही. आजही शहरात एका दिवसाआड पाणी मुबलक प्रमाणात पाणी येत आहे. मात्र येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून येळगाव धरणात मुबलक प्रमाणात जलसाठा होणे आवश्यक होते. दरम्यान शुक्रवारी रात्री, शनिवारी, बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील नाल्यांना पूर आला. देऊळघाट येथून वाहणार्या पैनगंगा नदीला पूर आला. त्यामुळे येळगाव धरणात १२.४0 द.ल.घ.मी. म्हणजे १00 टक्के जलसाठा आला व आता धरण ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर पाण्याचा वेग कमी झाल्यामुळे येळगाव धरणाचे दरवाजे उघडण्यात आले नाही. धरण १00 टक्के भरल्यामुळे येणार्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नसून बुलडाणासह परिसरातील गावांची चिंता मिटली आहे.
दोन दिवसाच्या दमदार पावसाचा परिणाम
बुलडाणा शहरासह ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणार्या येळगाव धरणात पाणीसाठय़ाची क्षमता १२.४0 द. ल. घ. मी. आहे. मागिल वर्षी पावसाळ्यात धरण १00 टक्के भरले होते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवली नाही. पावसाळ्यापूर्वी धरणात 0.९0 द.ल.घ.मी. जलसाठा होता. मात्र शुक्रवार व शनिवार रात्रीसह आतापर्यंंत झालेल्या दमदार पावसामुळे धरणात पुन्हा १२.४0 द.ल.घ.मी जलसाठा आला आला आहे.