जलाशये कोरडी; ग्रामीण भागात पाणीबाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 03:34 PM2019-06-03T15:34:44+5:302019-06-03T15:35:46+5:30

खामगाव : सध्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात ज्या धरणांवर पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत; अशी सर्व धरणे कोरडी पडल्याने पाणी उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे.

Reservoirs are dry; Water scarcity in the rural areas! | जलाशये कोरडी; ग्रामीण भागात पाणीबाणी!

जलाशये कोरडी; ग्रामीण भागात पाणीबाणी!

Next

खामगाव : सध्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात ज्या धरणांवर पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत; अशी सर्व धरणे कोरडी पडल्याने पाणी उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे गावा-गावात पाण्यासाठी महिलांसह नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. प्रशासनाकडून टँकरद्वारे तसेच विहिरी अधिग्रहित करून पाण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र अधिग्रहित केलेल्या विहिरीही आटत आहेत. उपलब्ध करून देण्यात येत असलेले पाणी कमी पडत आहेत. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरांचीही तीच अवस्था आहे. अशा अवस्थेत अनेक सामाजिक संघटनांकडून टँकरने मोफत पाणी वाटप करण्यात येत असून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळत आहे.
जवळच असलेल्या दुर्गादैत्य येथे पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत आहेत. येथील मुख्य पाण्याचे स्त्रोत असलेल्या विहिरी, बोरवेल, हातपंप आटले असून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
वानखेडसह दुर्गादैत्य परिसरात पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. यामुळे या परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. स्थानिक ग्राम पंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे दुर्गादैत्य वासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेष करून महिलांचे अतिशय हाल होत आहेत.
गावात लाखो रुपये खर्च करुन आणलेली महाजल योजना कुचकामी ठरली असल्याचे दिसून येत आहे. १४० गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत असले, तरी पाईपलाईन अभावी हे काम रखडले आहे. सध्या गावाच्या मुख्य रस्त्यावरुन वानखेडकडे जाणाऱ्या पाईपलाईनच्या लिकेजद्वारे निघणाºया पाण्यावर नागरिक आपली तहान भागवत आहेत. आणखी १ महिना नागरिकांना काढावा लागणार आहे. त्यामुळे पाणी समस्या निकाली काढण्याची गरज आहे.
 

Web Title: Reservoirs are dry; Water scarcity in the rural areas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.