प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांच्या पूर्वसंमती मिळण्याचा प्रश्न निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:41 AM2021-09-07T04:41:34+5:302021-09-07T04:41:34+5:30

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी अनुदानीत स्प्रिंकलर व ठिंबक संचासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज केले आहेत. परंतु, योजना नवीन असल्याने यामध्ये ...

Resolved the issue of getting the prior consent of the farmers on the waiting list | प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांच्या पूर्वसंमती मिळण्याचा प्रश्न निकाली

प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांच्या पूर्वसंमती मिळण्याचा प्रश्न निकाली

Next

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी अनुदानीत स्प्रिंकलर व ठिंबक संचासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज केले आहेत. परंतु, योजना नवीन असल्याने यामध्ये शेतकऱ्यांचा गोंधळ उडत असल्याने ज्यांनी कागदपत्रे अपलोड केले नाही किंवा पूर्वसंमती मिळूनसुद्धा साहित्य खरेदी केले नाही. अथवा बिल अपलोड केले नाही किंवा ज्यांनी अर्ज केले आहेत; परंतु निवडीमध्ये नंबर आला नाही, अशा सर्व शेतकरी व विक्रेत्यांची चिखली पंचायत समिती सभागृहामध्ये १ सप्टेंबरला कृषी विभागाच्यावतीने बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत अनेक महिने उलटूनहही पूर्व संमती न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतल्याने गदारोळ निर्माण झाला होता. याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांना दिली असता सरनाईक यांनी पंचायत समिती सभागृह गाठून शेतकऱ्यांच्या मागण्या व तक्रारी लेखी स्वरूपात घेण्यात याव्यात व प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यात यावी, याबाबत वरिष्ठांना प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी मागणी लावून धरली होती. दरम्यान, निवड ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांच्या पूर्वसंमतीबाबत वरिष्ठांना कळवून लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन तालुका कृषी अधिकारी व वरिष्ठांकडून देण्यात आले होते. त्यानुसार ५ सप्टेंबरला तालुक्यातील सोमठाणा, मुरादपूर, बेराळा, भोगावती, अंबाशी, पळसखेड, खैरव, आदी गावांतील शेतकऱ्यांना पूर्वसंमतीचे ‘एसएमएस’ प्राप्त झाल्याने प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळण्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने स्वाभिमानीच्या प्रयत्नांना यश आले आहे. बैठकीला सरनाईक यांच्यासह रविराज टाले, शुभम डुकरे, राष्ट्रवादीचे प्रसाद पाटील, गोदरी ग्रामपंचायत सदस्य गणेश देशमुख, नामदेव ऊसर, योगेश झगरे, बळिराम प्र. इंगळे, मंगेश झगरे, मिलिंद जाधव यांच्यासह चिखली तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Resolved the issue of getting the prior consent of the farmers on the waiting list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.