घरातूनच सुरू व्हावा महिलांचा सन्मान
By admin | Published: January 7, 2015 12:34 AM2015-01-07T00:34:36+5:302015-01-07T00:34:36+5:30
महिला सबलीकरणात अडथळे पार करण्यासाठी लोकमत परिचर्चेत महिलांनी मांडले नवे सूत्र .
बुलडाणा : सावित्री- जिजाऊ दशरात्रोत्सव सुरू आहे. या दरम्यान महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव सर्वत्र होत आहे. हा गौरव केवळ कार्यक्रमापुरता, भाषणांपुरता नको तर आचरणात आला पाहिजे, महिलांना सन्मान देण्याची प्रक्रिया ही घरातूनच सुरू झाली तर तो संस्कार समाजापर्यंंत झिरपत जाईल व एक निकोप समाजव्यवस्था आपण देऊ शकु, त्यामुळे या दशरात्रौत्सवात महिलांना सन्मान देण्याची प्रक्रिया ही घरातूनच सुरू व्हावी, असा सूर ह्यलोकमतह्ण परिचर्चेतून समोर आला आहे.
लोकमत जिल्हा कार्यालयात आयोजित या परिचर्चेत विविध क्षेत्रातील महिलांनी आपली मते परखडपणे मांडली. प्राचार्य शाहिना पठाण यांनी चर्चेची सुरुवात करताना शिक्षणाने शिक्षित झालो; पण आचरणात किती आले, असा प्रश्न उपस्थित करून पुरूषी मानसिकतेवर बोट ठेवले. काँग्रेसच्या नेत्या जयङ्म्री शेळके यांनी महिला सक्षमीकरणातील अडथळ्यांची मालिकाच विषद करून प्रत्येक घरातून सबलीकरणाची व्यवस्था सुरू झाली पाहिजे, असा आग्रही मुद्दा मांडला. जिल्हा परिषदेच्या लेखाधिकारी स्मिता तिमसे यांनी महिला म्हणजे घरातील अनपेड सर्व्र्हंंट नाहीत, त्यांनाही विचार व निर्णय स्वातंत्र्य असले पाहिजे, असे परखड मत मांडले, लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत अनेक उदाहरणे देत जिजा चांदेकर यांनी सर्व प्रकरणांच्या मुळाशी असलेली मानसिकता बदलण्याची गरज व्यक्त केली. प्रा.संगीता काळणे यांनी आजच्या तरूण पिढीची मते स्पष्ट करून स्वातंत्र्याचा स्वैराचार न होता समानतेची व्यवस्था निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली, तर महिला अत्याचार निर्मूलन समितीच्या समुपदेशक दीपाली राऊत यांनी महिलांना निर्णय स्वातंत्र्य देण्याची गरज व्यक्त केली.
तब्बल एक तास रंगलेल्या या चर्चेत महिलांनी आपली मते अधिक परखडपणे मांडली. या परिचर्चेत प्राचार्य शाहिना पठाण, महिला लोकआयोगाच्या सदस्य जिजा चांदेकर, प्रा. संगीता काळणे, समुपदेशक दीपाली राऊत, जि. परिषदेतील लेखाधिकारी स्मिता तिमसे व महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीसजयङ्म्री शेळके यांनी सहभाग नोंदविला.