महाडीबीटीवर अर्ज करण्याला प्रतिसाद - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:33 AM2021-03-21T04:33:27+5:302021-03-21T04:33:27+5:30

या सुविधेंतर्गत लाभार्थींनी आपल्‍या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ त्‍यांना घेता येणार आहे. २०२१-२०२२ ...

Response to application on MahaDBT - A | महाडीबीटीवर अर्ज करण्याला प्रतिसाद - A

महाडीबीटीवर अर्ज करण्याला प्रतिसाद - A

Next

या सुविधेंतर्गत लाभार्थींनी आपल्‍या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ त्‍यांना घेता येणार आहे. २०२१-२०२२ करिता अर्ज स्‍वीकृती प्रक्रिया सुरू करण्‍यात आली असून यात ज्‍या शेतकऱ्यांनी सन २०२०-२०२१ मध्‍ये महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केला आहे, परंतु त्‍यांची कोणत्‍याही योजनेसाठी निवड झाली नाही ते शेतकरी त्‍यांच्‍या अर्जातील बाबींमध्‍ये बदल करू शकणार आहेत. असे अर्ज सन २०२१-२०२२ करिता ग्राह्य धरले जातील. त्‍याकरिता त्‍यांच्‍याकडून पुन्‍हा शुल्‍क आकारले जाणार नाही. सन २०२१-२०२२ करिता वरील अर्जातील ज्‍या बाबींकरिता अर्ज केलेला नाही त्‍या बाबींचा अर्जामध्‍ये विनाशुल्‍क समावेश करता येईल. ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करुन त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल, असे सिंदखेड राजा तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांनी सांगितले.

Web Title: Response to application on MahaDBT - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.