बालकांच्या ‘पीसीव्ही’ लसीकरणाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:21 AM2021-07-23T04:21:22+5:302021-07-23T04:21:22+5:30
बीबीएफ पद्धतीने पिकांची पेरणी किनगाव राजा: कृषी विभागाद्वारे यंदा कृषी संजीवनी सप्ताहादरम्यान बीबीएफ (रूंद सरी वरंबा) पद्धतीने पिकांची पेरणी ...
बीबीएफ पद्धतीने पिकांची पेरणी
किनगाव राजा: कृषी विभागाद्वारे यंदा कृषी संजीवनी सप्ताहादरम्यान बीबीएफ (रूंद सरी वरंबा) पद्धतीने पिकांची पेरणी करण्यासंदर्भाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मार्गदर्शन करण्यात आले होते. या पद्धतीने होणारा फायदा पाहता त्यास तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
त्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ द्या!
देऊळगाव मही: कोरोनामुळे निधन पावलेल्या एस.टी.कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांच्या विम्याचा लाभ देण्याची मागणी होत आहे. कोरोना महामारीच्या काळात शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना घरीच राहावे लागले. त्यामुळे त्यांचा रोजगार बुडाला. त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला.
ग्रामीण भागात जलजन्य आजार
मोताळा : तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे; मात्र वातावरणातील बदलाने ग्रामीण भागातील नागरिकांना जलजन्य आजाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
लाेणार परिसरात झाडांची कत्तल
लाेणार : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात झाडांची कत्तल करण्यात येत असल्याचे चित्र आहे. झाडांच्या बुंध्याला आग लावून दुसऱ्या दिवशी परस्पर विल्हेवाट लावण्यात येत असल्याचे चित्र आहे. याकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हाेत आहे.
घरकुल बांधकामाची रक्कम केव्हा वाढणार
चिखली: तालुक्यातील पेठ येथील घरकुल बांधकामाची रक्कम वाढवून देण्याची मागणी लाभार्थ्यांनी निवेदनाद्वारे केली. महागाईच्या काळात घरकुल बांधकामही परवडत नसल्याचे चित्र आहे. घरकुल बांधकामाची रक्कम केव्हा वाढणार, असा प्रश्न लाभार्थ्यांमधून उपस्थित होत आहे.
पाझर तलाव दुरुस्तीचा प्रश्न
मेहकर: तालुक्यातील काही भागातील पाझर तलावाच्या भिंतीची दुरुस्ती करण्याची मागणी उन्हाळ्यातच करण्यात आली होती. आता पावसाळ्याचे दिवस असल्याने ही दुरुस्ती होऊ शकत नाही. त्यामुळे पाझर तलाव दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.