‘मुख कर्करोग पूर्व निदान’ कार्यशाळेस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:27 AM2020-12-25T04:27:50+5:302020-12-25T04:27:50+5:30
या कार्यशाळेत पुणे येथील कर्करोग तज्ज्ञ डॉ. राम पाटील आणि दंतरोग तज्ज्ञ डाॅ. अनुजा पाटील यांनी मार्गदर्शन केले. समाजामध्ये ...
या कार्यशाळेत पुणे येथील कर्करोग तज्ज्ञ डॉ. राम पाटील आणि दंतरोग तज्ज्ञ डाॅ. अनुजा पाटील यांनी मार्गदर्शन केले. समाजामध्ये तंबाखू सेवानामुळे होणाऱ्या दुष्परिणांची माहिती नसून त्याबाबत जनमानसात जागृती करण्याची गरज असल्याचे मत डॉ. राम पाटील व डॉ. अनुजा पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन करताना मांडले. तसेच उदाहरणांसह तंबाखू सेवानाचे परिणाम त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी समाजामध्ये याबाबत जनजागृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. डॉ. राम पाटील यांनी मुख कर्करोग पूर्व लक्षणांच्या आधारावर लवकर निदान होणे आवश्यक आहे, असे सांगून त्यासंदर्भातील लक्षणेही या कार्यक्रमात सांगितली. उपकरणाशिवाय उघड्या नजरेने ते कसे करावे, संशयास्पद रुग्णांची पुढील तपासणी आणि उपचार याविषयही सविस्तर मार्गदर्शन द्वयांनी केले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नर्सिंग स्कूलच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.
प्रास्ताविकात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या डॉ. लता भोसले यांनी यांनी मुख कर्करोगासंदर्भाने सविस्तर माहिती देऊन कार्यशाळेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. या कार्यक्रमास डॉ. कदम, डॉ. अजित मेटकर, अर्चना आराख, सरकटे, यांच्यासह अन्य उपस्थित होते.
महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी होणार तपासणी
कर्करोग पूर्व निदानासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात सुविधा उपलब्ध करण्यात आली असून दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी सकाळी १० ते दुपारी १ या कालावधीत पुणे येथील कर्करोग तज्ज्ञ डॉ. राम पाटील आणि डॉ. अनुजा पाटील (दंतरोग तज्ज्ञ) या तपासणी करणार आहेत. सोबतच अनुषंगिक मार्गदर्शनही करणार आहेत.