कोलारा येथे लसीकरण महोत्सव अभियानास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:34 AM2021-04-18T04:34:35+5:302021-04-18T04:34:35+5:30

चिखली : तालुक्यातील कोलारा येथे लसीकरण महोत्सव अंतर्गत १५ एप्रिल रोजी आमदार श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित लसीकरण ...

Response to Vaccination Festival Campaign at Kolara | कोलारा येथे लसीकरण महोत्सव अभियानास प्रतिसाद

कोलारा येथे लसीकरण महोत्सव अभियानास प्रतिसाद

Next

चिखली : तालुक्यातील कोलारा येथे लसीकरण महोत्सव अंतर्गत १५ एप्रिल रोजी आमदार श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित लसीकरण अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अंतर्गत एकाच दिवशी ३२८ ग्रामस्थांचे लसीकरण पार पडले आहे.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारकडून लसीकरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते. त्याअंतर्गत कोलारा येथे १५ एप्रिल रोजी लसीकरण करण्यात आले. येथील नागरिकांनी या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद देत ३२८ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला. कोरोनाची वाढता प्रादुर्भाव पाहता त्यास रोखण्यासाठी लसीकरण गरजेचे असल्याने मतदार संघातील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन यानिमित्ताने आमदार श्वेता महाले यांनी केले आहे. दरम्यान कोलारा येथील श्री सिद्धेश्वर महाराज संस्थानमध्ये पार पडलेल्या या अभियानप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.कृष्णकुमार सपकाळ, पं.स. सदस्या मनीषा सपकाळ, साहेबराव पाटील सोळंकी, सरपंच वनिता सोळंकी, ग्रा.पं. सदस्य भिकाजी सोळंकी, सिद्धेश्वर सोळंकी, गणेश सोळंकी, धोंडू पाटील सोळंकी, किसनराव सोळंकी, भगवानराव सोळंकी, तंटामुक्ती अध्यक्ष साहेबराव सोळंकी, किसान आघाडी जिल्हा उपाध्यक्ष उद्धवराव पवार, शेषराव सोळंकी, नामदेवराव सपकाळ आदी नागरिकांची उपस्थिती होती. लसीकरण राबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अंत्री खेडेकरचे आरोग्य अधिकारी डॉ. विनोद वायाळ, आरोग्य सेवक काकडे, कस्तुरे, आरोग्य सेविका काळुसे आदी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह डॉ.विठ्ठल सोळंकी, रामेश्वर सोळंकी, जीवन सोळंकी, ऋषीकेश सोळंकी, अनंथा सोळंकी, पप्पू सोळंकी, जगन्नाथ सोळंकी, श्री सिद्धेश्वर विद्यालय कोलाराचे शिक्षक, जि.प. शाळेचे सर्व शिक्षक, आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसचिव यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Response to Vaccination Festival Campaign at Kolara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.