टंकलेखन परीक्षा पूर्ववत सुरू करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:37 PM2017-10-29T23:37:33+5:302017-10-29T23:37:39+5:30
शिवाय संगणक टंकलेखन कोर्सची फी व त्यासाठी लागणारे साहित्य व वीज या बाबी लक्षात घेता टाइपरायटर टंकलेखन परीक्षा पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा टंकलेखन संस्था संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : शासनाने टंकलेखनऐवजी संगणक टायपिंगचा पर्याय उपलब्ध करून दिल्याने टंकलेखनाचे कोर्स चालविणार्या संस् थाचालकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. शिवाय संगणक टंकलेखन कोर्सची फी व त्यासाठी लागणारे साहित्य व वीज या बाबी लक्षात घेता टाइपरायटर टंकलेखन परीक्षा पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा टंकलेखन संस्था संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली.
स्थानिक रेणुका टंकलेखन संस्थेत २९ ऑक्टोबर रोजी बुलडाणा जिल्हा टंकलेखन संस्था संघर्ष समितीची स्थापना होऊन या समितीमार्फत शासनाकडे टंकलेखन परीक्षा पूर्ववत सुरू होण्याबाबत पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हाभरातील टंकलेखन संस्थाचालकांची उपस्थिती होती. संगणक टायपिंग कोर्सची फी जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना ते आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. तसेच भारनियमनाचा परिणाम संगणक टायपिंगवर होते, तर संगणक टायपिंग परीक्षेचे मिळालेले गुण पाहून, नापास होणार्यांची संख्या बघून, विद्यार्थी संगणक टायपिंगला प्रवेश घेण्यास जास्त इच्छुक नाहीत. या सर्व बाबींमुळे टंकलेखन संस्थाचालकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असून, ऑगस्ट २0१७ मध्ये नापास झालेले आणि एका विषयात पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील टंकलेखन परीक्षा आवश्यक असल्याने याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी संघर्ष समितीने रूपरेषा यावेळी ठरविली.