रेस्टॉरन्ट, बार सुरू; पहिल्या दिवशी अत्यल्प प्रतिसाद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:59 AM2020-10-06T11:59:30+5:302020-10-06T11:59:40+5:30
Restaurant, Hotels open in Bulhana पहिल्या दिवशी ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद दिसून आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून बंद असलेले रेस्टॉरंट, हॉटेल, बार ५ आॅक्टोबरपासून सुरू झाले. पहिल्या दिवशी ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद दिसून आला आहे. होणारे नुकसान टाळण्यासाठी रेस्टारंट चालकांनी खाद्यपदार्थांमध्ये कपात केली आहे. तसेच ३० टक्केच कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलावण्यात आले आहे.
अनलॉकच्या पुढच्या टप्प्यातील सवलतील राज्य शासनाले लागू केल्या आहेत. त्यामध्ये ५ आॅक्टोबर पासून हॉटेल्स, रेस्टॉरन्ट आणि बार सुरू करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वीच हॉटेल्स, रेस्टॉरन्ट व बार सॅनिटायीज करण्यात आले होते. सकाळी १० वाजता रेस्टॉरन्ट व बार उघडण्यात आले होते. जिल्ह्यात ४१५ बार व वाईन शॉप आहेत. परंतू बारवर पार्सल नेणाऱ्यांचीच संख्या होती. जास्त वेळ टिकतील असे पदार्थ बनविण्यात येत असल्याची माहिती बुलडाण्यातील रेस्टॉरन्ट चालक सुर्यवंशी यांनी दिली.