खासगी रुग्णालयांना परवानगीचे बंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:32 AM2021-04-19T04:32:14+5:302021-04-19T04:32:14+5:30
रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद बुलडाणा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन ...
रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलडाणा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काही ठिकाणच्या शिबिरात १३० व्या जयंती निमित्त १३० जणांनी रक्तदान करून महामानवास अभिवादन केले. सद्यस्थितीत राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्तदान शिबिरे घेण्यावर भर देण्यात येत आहे.
कृत्रिम पाणीटंचाई
हिवरा आश्रम : ग्रामीण भागामध्ये पाणी असूनही विद्युत पुरवठ्याअभावी नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात सदोष पाणीपुरवठा योजनांचाही परिणाम जाणवत आहे.
विविध कार्यक्रमांवर बंदी
बुलडाणा : कोविड-१९ या विषाणूच्या अनुषंगाने जिल्ह्यात संचारबंदी आहे. पवित्र रमजान महिन्यात कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांवर बंदी आहे. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लिम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.
फळविक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा
बुलडाणा : सध्या फळविक्रेत्यांना मुभा देण्यात आली असली तरी, कडक निर्बंधांमुळे ग्राहक येत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे फळविक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे. कोरोनाची भीती असल्याने काही ग्राहक बाहेरची खरेदी टाळत आहेत.