सोमवारपासून पुन्हा निर्बंध, दुकाने दुपारी ४ पर्यंतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:22 AM2021-06-27T04:22:51+5:302021-06-27T04:22:51+5:30
--सोमवार ते शुक्रवार काय सुरू राहील? ---- - अत्यावश्यक दुकाने, अत्यावश्यक नसलेली दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. - ...
--सोमवार ते शुक्रवार काय सुरू राहील? ----
- अत्यावश्यक दुकाने, अत्यावश्यक नसलेली दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
- दूध विक्री केंद्रे, दुग्धालय, डेअरी, दूध संकलन केंद्रे, दूध वितरण सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील.
-जीम, सलून, ब्युटी पार्लर ४ वाजेपर्यंत सुरू राहील. एसी बंद ठेवूनच ते चालू राहतील.
- हॉटेल, खानावळ, रेस्टॉरंट दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने चालू राहतील. शनिवार, रविवार घरपोच सेवा देता येईल.
- बिगर अत्यावश्यक दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू. (शनिवार, रविवार बंद)
-क्रीडांगण, उद्यान, मॉर्निंग वॉक व सायकलिंग सकाळी ५ ते ९ पर्यंत.
-सर्व प्रकारच्या आस्थापना व कार्यालय तसेच शासकीय कार्यालये नियमित.
-कृषीविषयक सेवा व कृषी सेवा केंद्रांना दुपारी ४ पर्यंत सेवा देता येईल.
-अंत्ययात्रेत २० जणांची उपस्थिती असेल.
-सांस्कृतिक कार्यक्रम ५० टक्के आसन क्षमतेने, लग्न समारंभ ५० व्यक्तींच्या उपस्थितीत आणि पूर्वपरवानगीनेच होतील.
- स्थानिक बैठका, निवडणूक कार्यक्रम ५० टक्के उपस्थितीत करता येतील.
-सार्वजनिक प्रवास, आंतरजिल्हा प्रवास या गोष्टी नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
-सार्वजनिक मैदाने, आऊटडोर खेळासाठी दर दिवशी सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंतचीच परवानगी राहील.
-उत्पादन क्षेत्रात नियमित पूर्णवेळ वाहतूक करता येईल. सोबतच अत्यावश्यक सेवेत न गणल्या गेलेल्या उद्योगांमध्ये ५० टक्के कर्मचारी, कामगार यांना हालचाल करण्यासह परवानगी राहील.
--
कोराेनाच्या डेल्टा विषाणूमुळे संक्रमणाचा धोका अधिक आहे. त्यामुळे निर्बंधांचे नागरिकांनी काटेकोर पालन करण्यासोबतच प्रतिबंधासाठी त्रिसूत्रीचे पालन करावे. सोमवारी सकाळी ७ पासून हे निर्बंध लागू राहतील.
- एस. रामामूर्ती, जिल्हाधिकारी, बुलडाणा
-