बुलडाणा जिल्ह्यात सोमवारपासून पुन्हा निर्बंध, दुकाने दुपारी ४ पर्यंतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 11:46 AM2021-06-27T11:46:56+5:302021-06-27T11:47:06+5:30

Restrictions in Buldana district : हे निर्बंध सोमवार २८ जून रोजी सकाळी ७ वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत लागू असणार असल्याचे शनिवारी काढण्यात आलेल्या आदेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहेत.

Restrictions in Buldana district again from Monday, shops only till 4 pm! | बुलडाणा जिल्ह्यात सोमवारपासून पुन्हा निर्बंध, दुकाने दुपारी ४ पर्यंतच!

बुलडाणा जिल्ह्यात सोमवारपासून पुन्हा निर्बंध, दुकाने दुपारी ४ पर्यंतच!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूने बाधित रुग्ण आढळून आले असून या विषाणूचा संक्रमण वेग अधिक आहे. त्यामुळे खबरदारी व प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बुलडाणा जिल्ह्यात सोमवारपासून तिसऱ्या स्तरातील निकषानुसार निर्बंध लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी घेतला आहे. हे निर्बंध सोमवार २८ जून रोजी सकाळी ७ वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत लागू असणार असल्याचे शनिवारी काढण्यात आलेल्या आदेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहेत.
कोविडची दुसरी लाट सध्या अेासरत असली तरी कोविडच्या डेल्टा प्लसचे २० पेक्षा अधिक रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सावध पवित्रा घेत शुक्रवारीच राज्यात तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू करण्याचे निर्देशित केले होते. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी यांनी २६ जून रोजी दुपारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक झाल्यानंतर हे आदेश दिले आहेत. 
२८ जूनपासून जीवनावश्यक वस्तूंच्या प्रतिष्ठानांसोबत इतरही प्रतिष्ठाने दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानी देण्यात आली आहे. मात्र सप्ताहाच्या शेवटी अैाषधांची प्रतिष्ठाने वगलून उर्वरित संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे.

सोमवार ते शुक्रवार काय सुरू राहील

 अत्यावश्यक दुकाने, अत्यावशक नसलेली दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
 दुध विक्री केंद्र, दुग्धालय, डेअरी, दुध संकलन केंद्रे, दुध वितरण सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेर्पंत सुरू राहतील.
 जिम, सलून, ब्युटी पार्लर ४ वाजेपर्यंत सुरू राहील. एसी बंद ठेवूनच ते चालू राहतील.
 हॉटेल, खानावर, रेस्टॉरंट दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने चालू राहतील. शनिवार, रविवार घरपोस सेवा देता येईल.
 बिगर अत्यावश्यक दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत पर्यंत सुरू (शनिवार, रविवार बंद)
 क्रीडांगण, उद्यान, मॉर्निंग वॉक व सायकलिंग सकाळी ५ ते ९ पर्यंत.
 सर्व प्रकारच्या आस्थापना व कार्यालय तसेच शासकीय कार्यलये नियमित
 कृषी विषयक सेवा व कृषी सेवा केंद्रांना दुपारी ४ पर्यंत सेवा देता येईल.

 

कार्यक्रम, समारंभ


 अंत्ययात्रे २० जणांची उपस्थिती असले.
 सांस्कृतिक कार्यक्रम ५० टक्के आसरण क्षमतेने, लग्न समारंभ ५० व्यक्तींच्या उपस्थितीत आणि पुर्वपरवानगीनेच तील.
 स्थानिक बैठका, निवडणूक कार्यक्रम ५० टक्के उपस्थितीत करता येतील.
 सार्वजनिक प्रवास, आंतरजिल्हा प्रवास या गोष्टी नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
 सार्वजनिक मैदाने, आऊटडोर खेळासाठी दर दिवशी सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंतचीच परवानगी राहील.
 उत्पादन क्षेत्रात नियमित पुर्णवेळ वाहतूक करता येईल. सोबतच अत्यावश्यक सेवेत न गणल्या गेलेल्या उद्योगांमध्ये ५० टक्के कर्मचारी, कामागार यांना हालचाल करण्यासह परवानगी राहील.

कोरानाच्या डेल्टा विषाणूमुळे संक्रमणाचा धोका अधिक आहे. त्यामुळे निर्बंधांचे नागरिकांनी काटेकोर पालन करण्यासोबतच प्रतिबधासाठी त्रिसुत्रीचे पालन करावे. सोमवारी सकाळी ७ पासून हे निर्बंध लागू राहतील.
- एस. रामामुर्ती, जिल्हाधिकारी, बुलडाणा

Web Title: Restrictions in Buldana district again from Monday, shops only till 4 pm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.