निर्बंध कायम, मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:37 AM2021-05-20T04:37:58+5:302021-05-20T04:37:58+5:30
वकिलांची कार्यालये राहणार सुरू वकिलांची कार्यालये, तसेच चार्टर्ड अकाउंटंटची कार्यालये सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. ...
वकिलांची कार्यालये राहणार सुरू
वकिलांची कार्यालये, तसेच चार्टर्ड अकाउंटंटची कार्यालये सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. याव्यतिरिक्त सराफा व्यावसायिकांसाठीही दुकान उघडून तपासणी करण्याकरिता गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.
मॉर्निंग, इव्हिनिंग वॉक, उद्याने बंद
निर्बंधांच्या या कालावधीत सार्वजनिक व खासगी क्रीडांगणे, उद्याने पूर्णत: बंद राहणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग वॉक करण्यास बंदी राहणार आहे.
सलून, ब्युटीपार्लर, शाळा बंद
कडक निर्बंधांच्या कालावधीत सर्व केश कर्तनालये, सलून, स्पा, ब्युटीपार्लर संपूर्णत: बंद राहतील. सोबतच शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, शिवकणी वर्ग बंद राहणार असून, ऑनलाइन पद्धतीने शिक्षणास प्रतिबंध राहणार नाही.
सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत
ही दुकाने राहणार सुरू
किराणा, औषधी, स्वस्त धान्य दुकानांसह इतर सर्व प्रकारची जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, भाजीपाला व फळविक्रीची दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री, सर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने, उद्योगगृहे, पाळीव प्राणी, खाद्य पदार्थांची दुकाने, पावसाळी हंगाम सामग्रीची दुकाने, पेट्रोल पंप, डिझेल व सीएनजी या कालावधीत सुरू राहतील.
बँका दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहणार
जिल्ह्यातील बँका या सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. येथे शेतकरी व ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता पाहता बँकेच्या ठिकाणी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त पुरविण्याची पोलीस प्रशासनाची जबाबदारी राहील. कोरोना प्रतिबंधांच्या त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक राहील. पतसंस्था, वित्तीय संस्था, विमा, पोस्ट पेमेंट बँक व आर्थिक बाबींशी संबंधित सर्व वित्तीय संस्था या कालावधीत सुरू राहतील.
कृषीसंबंधित दुकाने सकाळी ९ ते दुपारी
४ वाजेपर्यंत सुरू
कृषीशी संबंधित दुकाने, कृषी सेवा केंद्र, कृषी प्रक्रिया उद्योग, शेती अवजारे आणि शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकाने सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत या कालावधीत सुरू राहतील. यासंदर्भातील नियंत्रण व नियोजनाची जबाबदारीही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची राहील.
कृषी उत्पन्न बाजार समित्या
२३ मेपर्यंत बंद
कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या २३ मेपर्यंत बंद राहणार आहेत. त्यानंतर टोकन पद्धतीने नियोजनाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांवर राहील.
वृत्तपत्राचे वितरण सुरू राहणार
निर्बंधांच्या कालावधीत वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आनुषंगिक आदेशात नमूद केले आहे.
मंगल कार्यालये राहणार बंद
निर्बंधांच्या कालावधीत जिल्ह्यातील स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल पूर्णत: बंद राहतील. लग्न समारंभासाठी २५ व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी राहणार आहे.
शेतकऱ्यांसाठी रात्री ८ वाजेपर्यंत
पेट्रोलपंप सुरू राहणार
निर्बंधाच्या कालावधीत शासकीय मालवाहतूक, रुग्णवाहिका इत्यादी अत्यावश्यक वाहनांसोबत शेतातील कामे व मालाची वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांकरिता सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत.
भोजनालय, उपाहारगृहातून
‘होम डिलिव्हरी’
निर्बंधांच्या कालावधीत जिल्ह्यात रेस्टॉरंट, भोजनालये व उपाहारगृहांना सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत या कालावधीत केवळ होम डिलिव्हरीद्वारे सेवा देण्यास परवानगी राहणार आहे.