लग्न समारंभावर निर्बंध, वर वधू पित्यांची वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:34 AM2021-03-05T04:34:32+5:302021-03-05T04:34:32+5:30

कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून शासनाच्यावतीने संचारबंदी व लग्न समारंभाकरिता २५ नागरिकांची परवानगी देण्यात आली आहे. ...

Restrictions on the wedding ceremony, increased concern of the bride's father | लग्न समारंभावर निर्बंध, वर वधू पित्यांची वाढली चिंता

लग्न समारंभावर निर्बंध, वर वधू पित्यांची वाढली चिंता

Next

कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून शासनाच्यावतीने संचारबंदी व लग्न समारंभाकरिता २५ नागरिकांची परवानगी देण्यात आली आहे. एन लग्नसराईत ही परिस्थिती उद्भवल्याने वर आणि वधू पित्याची चांगलीच पंचाईत झाली आहे. दुसरीकडे लग्न समारंभ धुमधडाक्यात होत नसल्याने लग्न समारंभाशी निगडित व्यवसाय संकटात सापडले आहेत. आता गतवर्षीप्रमाणे कडक लॉकडाऊनची वेळ येते की काय, याची भीती निर्माण झाली आहे. सध्या लग्नाचे मुहूर्त ठरले आहेत. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यात लग्नसराईची धूम असते, तर काही गावांमध्ये एका तिथीवर अनेक लग्ने केली जात असल्याने पूर्वतयारी म्हणून काही पालकांनी अगोदरच मंगल कार्यालये, घोडा, बॅण्ड पथक पैसे देऊन बुकिंग केले आहेत. लग्नपत्रिका छापणे, वाटप करणे सुरू आहे. मात्र मागील महिन्यापासून कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले असल्याने त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने आठवड्यात शनिवार, रविवार दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. लग्नसमारंभासाठी परवानगी घेऊन २५ नागरिकांची मर्यादा शासनाच्यावतीने लावली आहे. लग्नसराईमध्ये व्यवसाय करण्याकरिता अनेक व्यवसायिकांनी बँका, पतसंस्थांकडून कर्ज घेतले आहे. गतवर्षीसुद्धा २४ मार्चपासून देशात लॉकडाऊन घोषित केले होते. कोणालाही अत्यावश्यक सेवा सोडून कामाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई होती. यंदा पुन्हा तीच परिस्थिती ओढावत असल्याने लग्न समारंभाशी निगडित असलेले व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.

कडक लॉकडाऊनची भीती

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कडक लॉकडाऊनची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे मंडप डेकोरेशन, मंगल कार्यालये, लग्नपत्रिका आदी व्यवसायांसह बँडपथक व इतर व्यावसायिकांचे आर्थिक बजेट कोलमडून उपासमारीची पाळी येण्याची शक्यता आहे.

Web Title: Restrictions on the wedding ceremony, increased concern of the bride's father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.