मका खरेदी पुन्हा सुरू; ३० जूनपर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:01+5:302021-06-16T04:46:01+5:30
जिल्ह्यामध्ये मका खरेदीसाठी ८ हजार ९२४ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. जिल्ह्यामध्ये पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली ...
जिल्ह्यामध्ये मका खरेदीसाठी ८ हजार ९२४ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. जिल्ह्यामध्ये पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची सभा झाली. त्यानुसार जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी मका खरेदीसाठी १४ खरेदी केंद्रांना मान्यता दिली आहे. यामध्ये तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या., बुलडाणा, मेहकर, लोणार, देऊळगावराजा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद व खानगाव, तसेच संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी सुलतानपूर केंद्र साखरखेर्डा, स्वराज्य शेतीपूरक सहकारी संस्था मर्या चिखली, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी देऊळगाव राजा केंद्र - सिंदखेडराजा, नांदुरा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, नांदुरा केंद्र - वाडी या केंद्रांचा समावेश आहे. त्यानुसार जिल्हा पणन अधिकारी, बुलडाणा यांनी जिल्ह्यामध्ये उपरोक्त ठिकाणी मका खरेदी सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत.
त्यानुसार ज्या शेतकऱ्यांना खरेदीसाठी एसएमएस येतील, त्यांनी वरील संस्थांकडे आपला माल विक्रीसाठी घेऊन यावे, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस शिंगणे यांनी केले आहे.