"मृत्यूच्या दारातून परतलो...", अपघातातील वाचलेल्या युवकाने सांगितला थरार
By ब्रह्मानंद जाधव | Published: July 1, 2023 04:58 PM2023-07-01T16:58:16+5:302023-07-01T16:58:32+5:30
अपघात घडला तेव्हा त्याच्या अंगावर दोन ते तीन प्रवाशी पडले आणि त्याला जाग आली.
सिंदखेड राजा (बुलढाणा) : अपघात एवढा भीषण होता की, यात २५ जणांचा जळून कोळसा झाला. या भीषण अपघातातून केवळ नशिब बलवत्तर, म्हणून मी वाचू शकलो, अशी भावनिक प्रतिक्रिया या अपघातातील बचावलेल्या आयुष घाडगे या प्रवाशाने दिले. आयुष घाडगे हा युवक नागपूरच्या बुटी बोरी येथून विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये बसला होता. छत्रपती संभाजी नगरला त्याला जायचे होते. प्रवासादरम्यान, आयुषला गाड झोप लागली होती.
अपघात घडला तेव्हा त्याच्या अंगावर दोन ते तीन प्रवाशी पडले आणि त्याला जाग आली. त्यावेळी बसमध्ये आग आणि आरडाओरडच सुरू होती. नेमके काय झाले हे काही कळायला मार्ग नव्हता. अशातच आयुषला एक खिडकी दिवस होती. त्याने क्षणाचाही विलंब न लावता, त्या खिडकीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला. आयुष सोबत आणखी साईनाथ रणसिंग पवार व योगेश रामदास गवई हे दोघेही एकमेकांचे हात धरून बाहेर आले. तिघेही खिडकीतून कसेबसे बाहेर पडताच त्या खिडकीतही आगीचे लोट आले. आणि संपूर्ण बसला आगीने गिळले होते. मृत्यूच्या या दारातून वाचण्याची आप बिती आयुषसह अन्य दोघांनी अत्यंत भाऊक होऊन व्यक्त केली.