महसूल कर्मचारी संघटनेचे बेमुदत कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:38 PM2017-10-12T13:38:43+5:302017-10-12T13:39:45+5:30

Revenue Employee Association's no Work Movement | महसूल कर्मचारी संघटनेचे बेमुदत कामबंद आंदोलन

महसूल कर्मचारी संघटनेचे बेमुदत कामबंद आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देमेहकर तालुक्यातील सर्व महसूल कर्मचारी सहभागी झाले आहेत. 

मेहकर : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने आपल्या प्रलंबीत मागण्यासंदर्भात राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १० आॅक्टोबर २०१७ पासून सुरु झालेल्या बेमुदत काम बंद आंदोलनात मेहकर तालुक्यातील सर्व महसूल कर्मचारी सहभागी झाले आहेत. 
महसूल कर्मचाºयांच्या प्रलंबीत मागण्यांमध्ये महसूल लिपीकाचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक असे करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार शासन निर्णय पारीत करणे, डीसीपीएस,एनपीएस योजना बंद करुन जुनी पेंशन योजना सुरु करणे, अव्वल कारकुन वर्ग ३ या संवर्गाच्या वेतन श्रेणीमधील त्रुटी दूर करणेबाबत, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गातील पदोन्नती देणेबाबत मान्य करण्यात आले होते त्यानुसार शासन निर्णय पारित करणे, पुरवठा विभागातील पुरवठा निरिक्षक संवर्गातील पदे हे पदोन्नतीचे असल्यामुळे सरळ सेवेने न भरणेबाबत. नायब तहसिलदाराचे सरळ भरतीची पदे प्रमाण ३३ टक्के वरुन २० टक्के करुन पदोन्नतीचे प्रमाण ८० टक्के पदे मंजूर केलेले आहे. त्यानुसार शासन निर्णय पारित करणे, आकृतीबंधाबाबत सुधारणा करणेबाबत दांगट समितीने सादर केलेल्या प्रस्तावात लिपीक, अव्वल कारकुन, नायब तहसिलदार इतर पदे वाढविलेली आहेत. यामध्ये कोणतीही कपात न करता त्वरीत मंजुरी देऊन त्यानुसार शासन निर्णय पारीत करणे, इतर विभागाच्या जसे संजय गांधी, गौण खनिज, रोहयो, निवडणुक, पुरवठा व महसूलेतर कामासाठी नव्याने आकृतीबंद तयार करुन त्वरीत सादर करुन मंजुरी आदेश निर्गमीत करणे, महसूल विभागातील व्यपगत झालेली पदे पुर्नजिवीत करण्याची कार्यवाही तात्काळ करावी व महसूल विभागाव्यतिरिक्त इतर विभागाच जसे संजय गांधी, गौण खनिज, रोहयो, निवडणूक व इतर विभागाचे व्यपगत झालेल्या पदांचा विचार करुन संबंधीत विभागास पदे पुर्नजिवीत करण्याचा प्रस्ताव तयार करुन मंजुरी आदेश निर्गमीत करणे, महसुल विभागातील वर्षानुवर्षापासून कार्यरत असलेली पदे अस्थाई स्वरुपाची असून ती स्थाई करण्यात यावी, अशा मागण्यांचा समावेश आहे. या कामबंद आंदोलनात तालुका संघटनेचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांसह महसूल कर्मचारी सहभागी झाले आहेत, अशी माहिती अध्यक्ष एस.आर. काळबांडे, यु.व्ही.गरकळ, एस.एस.परिहार यांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Revenue Employee Association's no Work Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.