रेती माफियांकडून चार लाख दंड वसूल!
By admin | Published: June 15, 2017 12:16 AM2017-06-15T00:16:22+5:302017-06-15T00:16:22+5:30
सिंदखेडराजा तालुक्यातून मे महिन्यामध्ये १२ रेती माफियांकडून ३ लाख १५ हजार ७०० रुपये तर एप्रिल महिन्यात पंधरा माफियांकडून १ लाख ४९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : तालुक्यातील खडकपूर्णा नदी पात्रामध्ये रेतीचा नैसर्गिक साठा मोठ्या प्रमाणात आहे. महसूल खात्यांतर्गत रेतीचा लिलाव करून कोट्यवधी रुपयांचा महसूल शासनाला दरवर्षी मिळतो; परंतु अवैध रेती माफियांना रोखण्यासाठी शासन अपयशी ठरले. अशा बिकट परिस्थितीत तहसीलदार संतोष कणसे यांच्या मोहिमेमुळे महसूल खात्याच्या अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या संयुक्त मोहिमेतून मे महिन्यात ४ लाख ६५ हजार रुपयाचा दंड रेती माफियांकडून वसूल करण्यात आला.
सिंदखेडराजा तालुक्यातून मे महिन्यामध्ये १२ रेती माफियांकडून ३ लाख १५ हजार ७०० रुपये तर एप्रिल महिन्यात पंधरा माफियांकडून १ लाख ४९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
मे महिन्यात रेती माफियांमध्ये जालींधर नागरे २२ हजार, समाधान म्हस्के २२ हजार, अरुण जायभाये २२ हजार, समाधान मुंढे वीस हजार ७००, दत्तात्रय दराडे २१ हजार, विजय सरकटे २० हजार, शेख अजहर ३० हजार, राजू खेरे ३२ हजार, निवृत्ती काळे ८० हजार, बंडू नागरे २१ हजार, शेख अलताफ २१ हजार व शेख खलील ४ हजार रुपये याप्रमाणे दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत तहसीलदार संतोष कणसे यांच्यासह एस. एस. चव्हाण, एस.ई. शिंगणे, बी. बी. वाघ, टी.एस. डोंगरदिवे, आर.एस. देशमुख, पी.पी. कुळकर्णी, जी.एस. हजारे यांचा सहभाग होता.