काँग्रेसच्या आंदोलनामुळे महसूल यंत्रणा टाइट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:37 AM2021-09-18T04:37:51+5:302021-09-18T04:37:51+5:30

परिणामी जनसामान्यांचा वाढता रोष व काँग्रेसची आक्रमकता पाहता महसूल प्रशासन अलर्ट मोडवर आले व अवघ्या २४ तासात आपद्ग्रस्तांची यादी ...

The revenue system is tight due to the Congress agitation | काँग्रेसच्या आंदोलनामुळे महसूल यंत्रणा टाइट

काँग्रेसच्या आंदोलनामुळे महसूल यंत्रणा टाइट

googlenewsNext

परिणामी जनसामान्यांचा वाढता रोष व काँग्रेसची आक्रमकता पाहता महसूल प्रशासन अलर्ट मोडवर आले व अवघ्या २४ तासात आपद्ग्रस्तांची यादी बनवून त्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची तत्परता दाखविण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आंदोलनामुळे महसूल यंत्रणा टाइट झाल्याचे सध्या आपद्ग्रस्त म्हणत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

--तत्परतेमुळे आंदोलन स्थगित--

१६ सप्टेंबर रोजी २४ तासात आपद्ग्रस्तांना मदत मिळाली नाही तर पुन्हा काँग्रेस आंदोलन करले, असा इशाराच काँग्रेसने दिला होता. महसूल यंत्रणेने दाखवलेली तत्परता पाहता शेवटी काँग्रेसनेही त्यांचे आंदोलन स्थगित केले.

--आज मदतीचे वाटप--

मोताळा तालुक्यात ९३ आपद्ग्रस्तांच्या घराची पडझड झाली आहे. त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयाप्रमाणे ही तातडीची आर्थिक मदत करण्यात येत आहे. १८ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात त्याचे वाटप होईल, असे मोताल्याचे तहसीलदार समाधान सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: The revenue system is tight due to the Congress agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.