कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:25 AM2021-05-31T04:25:38+5:302021-05-31T04:25:38+5:30
या बैठकीला जिल्हा परिषद कृषी सभापती राजू मामा पळसकर व मेहकर पंचायत समितीच्या सभापती निता दिलीपराव देशमुख व ...
या बैठकीला जिल्हा परिषद कृषी सभापती राजू मामा पळसकर व मेहकर पंचायत समितीच्या सभापती निता दिलीपराव देशमुख व माजी सभापती कैलास खंडारे, दिलीप देशमुख, वानखेडे, मंडळ अधिकारी ढोके, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आरू उपस्थित होते. भोसा गावात प्रत्येक घरी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व्हे करून प्रत्येकाची रॅपिड व आरटीपीसीआर कोरोना टेस्ट करावी तसेच त्यांची आराेग्य तपासणी करून रुग्णांचा शोध घ्यावा, जेणेकरून घरातील इतर व्यक्तींना कोरोना होणार नाही यांची दक्षता घ्यावी, याबाबत चर्चा करण्यात आली. भोसा गावातील नागरिकांना घाबरून न जाता समोर येऊन कोरोना तपासणी करावी, तसेच प्रत्येकाने लस घ्यावी, असे आवाहन राजू मामा पळसकर यांनी केले. भोसा या गावात आतापर्यंत चार व्यक्तींचा मृत्यू झाला असून, २६ जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. नऊ विलगीकरण कक्ष मेहकर येथे ठेवण्यात आले आहेत. एका जणावर बुलडाणा येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. दिलीप देशमुख यांनीसुद्धा भोसा या गावातील घराघरात प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्याचे आवाहन केले. यावेळी पोलीसपाटील, उपसरपंच, शिक्षक रा.का. जाधव, बा.रा. भगत, इंगळे, देशमुख, शेळके, जयपुरे, तोेंडे, अंगणवाडीसेविका शारदा डाखोरे, शारदा मुळे, खुरद, अंगणवाडी मदतनीस सुनीता भोेंडणे, मुळे आशासेविका ज्योती शिंदे, मोघाड, जाधव, ग्रामसेवक पी.के. गवई हजर होते.