जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचे सुधारित धोरण - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:32 AM2021-04-13T04:32:23+5:302021-04-13T04:32:23+5:30
शासनाने अंतर जिल्हा बदलीचे नवीन धोरण नुकतेच जाहीर केले असून, त्यामधे शिक्षकांना न्याय मिळण्याची शक्यता बळावली आहे. आंतर जिल्हा ...
शासनाने अंतर जिल्हा बदलीचे नवीन धोरण नुकतेच जाहीर केले असून, त्यामधे शिक्षकांना न्याय मिळण्याची शक्यता बळावली आहे. आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची अगोदरच्या जिल्ह्याची सेवाज्येष्ठता ग्राह्य धरण्यात यावी, त्याचबरोबर जिल्हा परिषद मध्यामिक व उच्चमाध्यमिक शिक्षकांना ही संधी उपलब्ध करून द्यावी.
डी. डी. वायाळ, अध्यक्ष, जि. प. माध्यमिक संघ.
नवीन सूचनांमध्ये काय बदल करण्यात आले आहेत?
ज्या शिक्षकाला आंतर जिल्हा बदली हवी आहे, त्या शिक्षकाची संबंधित जिल्हा परिषदमध्ये किमान पाच वर्ष सलग सेवा होणे अनिवार्य आहे. आंतरजिल्हा बदली हा संबंधित शिक्षकांचा हक्क नाही. ज्या जिल्हा परिषदेचे रोस्टर (बिंदुनामावली) विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष, यांनी तपासून दिले आहे, अशा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होईल. या बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांनी अर्ज करताना जास्तीत जास्त चार जिल्हा परिषदांची निवड करण्याची मुभा राहील. बदल्या या यापूर्वी निश्चित केलेल्या धोरणानुसार १० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त असल्यास त्या जिल्हा परिषदांमधून शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने बाहेर जाता येणार नाही.