सुधारीत -राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलन बुलडाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:31 AM2021-01-18T04:31:32+5:302021-01-18T04:31:32+5:30

बुलडाणा : देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांना समर्पित राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलनाचे आयोजन २३ जानेवारी रोजी बुलडाणा ...

Revised state-level Netaji Jagar Sahitya Sammelan in Buldana | सुधारीत -राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलन बुलडाण्यात

सुधारीत -राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलन बुलडाण्यात

Next

बुलडाणा : देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांना समर्पित राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलनाचे आयोजन २३ जानेवारी रोजी बुलडाणा नगरीत करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक माजी जिल्हाधिकारी विश्वास पाटील संमेलनाध्यक्ष राहणार आहेत, तर स्वागत अध्यक्ष म्हणून डाॅ. सुकेश झंवर राहणार आहे .

उद्घाटन सत्र, तीन परिसंवाद, समारोपीय सत्र व कविसंमेलन अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी आहे.

स्थानिक गर्दे सभागृहात संमेलन पार पडणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशप्रेमी विचार समाजाच्या तळागाळात पोहोचविण्यासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून आझाद हिंद संघटना कार्यरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे संस्थापक ॲड. सतीशचंद्र रोठे यांनी दिली.

याबाबत कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक १६ जानेवारी राेजी पार पडली. यावेळी संमेलनाच्या आयोजनासंबंधी सखोल चर्चा करण्यात आली. ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे, शेतकरी नेते अविनाश काकडे, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासह राज्यातील साहित्यिक, लोकप्रतिनिधी व जिल्ह्यातील साहित्यिकांचा सहभाग राहणार असल्याचे ॲड. रोठे यांनी सांगितले. बुलडाणा जिल्ह्यासह शहरातील सर्व सामाजिक, राजकीय व वैयक्तिक प्रतिष्ठानच्या वतीने ऐतिहासिक नेताजी सागर साहित्य संमेलनात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Revised state-level Netaji Jagar Sahitya Sammelan in Buldana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.