दहिगाव फाट्यावर रेशनचा २६ क्विंटल तांदूळ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:31 IST2017-11-04T00:30:10+5:302017-11-04T00:31:54+5:30
अमडापूर : चिखली तालुक्यातील दहिगाव फाट्यावर एका बोलेरो पिक मध्ये रेशनचा काळाबाजारात विक्रीसाठी जात असलेला २६ क्विंटल तांदूळ दोन नोव्हेंबर रोजी पोलिसांनी जप्त केला.

दहिगाव फाट्यावर रेशनचा २६ क्विंटल तांदूळ जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर : चिखली तालुक्यातील दहिगाव फाट्यावर एका बोलेरो पिक मध्ये रेशनचा काळाबाजारात विक्रीसाठी जात असलेला २६ क्विंटल तांदूळ दोन नोव्हेंबर रोजी पोलिसांनी जप्त केला.
गोपनीय माहितीच्या आधारावर ठाणेदार विक्रांत पाटील यांनी त्यांचे सहकारी पोलीस नाईक संजय नागवे, एएसआय वीरू सीद, पोकाँ नीलेश वाकडे यांनी ही कारवाई केली. नाकाबंदीदरम्यान बोलेरो पिक (क्रमांक एमएच ३0 बी १२१४) ही गाडी ताब्यात घेण्यात आली. सोबतच या प्रकरणी दोन पुरुषांसह पाच महिलांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक आरो पी हे धोत्रा भनगोजी येथील आहेत. पुरवठा निरीक्षक योगेश जंगले यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे. गाडी चालक हासनशाह सदार शाह, शेख आमिर हामजा शे.मुसा व त्यांच्यासोबत पाच महिला रेशनचा २६ क्विंटल तांदूळ काळाबाजारात विक्रीस घेऊन जात होते. या मालाची किंमत ५0 हजार रुपये आहे. या आशयाच्या तक्रारीवरून अमडापूर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत तांदूळ आणि गाडीसह पाच लाख रु पयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करी त आहेत.