श्रीमंतांचे फळ उतरले गरिबांच्या आवाक्यात!

By admin | Published: August 23, 2016 01:45 AM2016-08-23T01:45:22+5:302016-08-23T01:45:22+5:30

बुलडाणा जिल्ह्यात २00 रुपये किलोंचे सफरचंद ८0 रुपयांवर.

Rich landed poor people! | श्रीमंतांचे फळ उतरले गरिबांच्या आवाक्यात!

श्रीमंतांचे फळ उतरले गरिबांच्या आवाक्यात!

Next

ब्रह्मनंद जाधव
बुलडाणा, दि. २२ : श्रीमंतांचे फळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सफरचंदाची बुलडाणा जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून सिमला येथून आवक सुरू झाली आहे. त्यामुळे २00 रुपये किलोंचे सफरचंद ६0 ते ८0 रुपये प्रतिकिलोवर आले असून, श्रावण मासात येणार्‍या वेगवेगळ्या उपवासासाठी सफरचंदाची मागणी वाढली आहे. सफरचंदाचे भावही कमी झाल्याने श्रीमंतांचे फळ सफरचंद गरिबांच्या चवीला उतरले आहे.
सफरचंद या फळाचे उत्पादन घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील जमीन व वातावरण पोषक नसल्याने राज्यात सफरचंदचे उत्पादन घेतले जावू शकत नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यात सफरचंदाची आवक विदेशातून होते. परिणामी, सफरचंदाचे भाव १00 ते २00 रुपये प्रतिकिलोच्या दरम्यान राहतात. सर्व फळांमध्ये सफरचंद हे आरोग्यासाठी पौष्टिक फळ आहे; परंतु सर्व फळात सफरचंद हे फळ किमतीने महागडे असल्यामुळे सफरचंदाची खरेदी सर्वसामान्य गरिबांच्या आवाक्याबाहेर जाते. त्यामुळे सफरचंद या महागड्या फळाला श्रीमंतांचे फळ म्हटले जाते. काश्मीर आणि हिमाचलच्या काही जिल्ह्यात सफरचंद या फळाच्या उत्पादनासाठी पोषक वातावरण असते. सफरचंदाचे सर्वाधिक मोठे उत्पादक राज्य काश्मीरमध्ये जवळपास सर्वच जिल्ह्यात चांगली राहत असल्यामुळे काश्मीरी सफरचंदांच्या बागायतींवर चांगला परिणाम होतो. काश्मीरमध्ये यावर्षी २0.३७ लाख टन सफरचंद उत्पादन तर मागील वर्षी हा आकडा १३.६८ टन होता. हिमाचलमध्ये मागील वर्षी ६.२५४ लाख टन सफरचंद उत्पादन झाले. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात संपूर्ण उन्हाळाभर काश्मीरमधून सफरचंदची आवक झाली. बुलडाणा जिल्ह्यातही काश्मीरमधून सफरचंदाची आवक झाली. काश्मीरमधून येणारे सफरचंद २00 रुपये प्रतिकिलो विकले जात होते. १५ ऑगस्टपासून जिल्ह्यात सिमला येथून सफरचंदची आवक सुरू झाली आहे.

Web Title: Rich landed poor people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.