खामगावात रिपाइंचे डफडे बजाव आंदोलन; विविध मागण्यांचे उपविभागीय अधिकार्यांना निवेदनलोकमत
By अनिल गवई | Published: March 3, 2023 04:19 PM2023-03-03T16:19:51+5:302023-03-03T16:21:39+5:30
यावेळी विविध न्याय मागण्यांचे निवेदनाही उपविभागीय अधिकार्यांना सादर करण्यात आले.
खामगाव: तालुक्यातील घाटपुरी आणि इतर ग्रामपंचायत हद्दीतील बेघर रहिवाशांना नियमानुसार राहत असलेल्या जागा कायम करून देण्यात याव्या, या प्रमुख मागणीसाठी रिपाइंआंबेडकर पक्षाच्यावतीने शुक्रवारी स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध न्याय मागण्यांचे निवेदनाही उपविभागीय अधिकार्यांना सादर करण्यात आले.
उपविभागीय अधिकार्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले की, बेघर रहिवाशांना जागेचा नमुना ८ देण्यात यावा, तसेच त्या जागा नियमाकुल करण्यात येऊन बेघरांना राहत असलेल्या जागेतच घर बांधून देण्याचे आदेश देण्या्चया खामगाव तालुक्यात भूमिहिन अतिक्रमण धारक गत २० ते ३० वर्षांपासून जमीन पिकवित आहेत. त्या अनुषंगाने सरकारने या भूमिहिन लोकांना तात्काळ ई क्लास आिण एफ क्लास शेत जमिनीचे भाडेपट्टे देण्यात यावे. चार पाच वर्षांपूर्वी काढलेले नवीन रेशनकार्ड चालू करण्यात यावे, रेशनकार्ड धारकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात यावा, यासह विविध मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष भाई संतोष इंगळे यांनी केले. आंदोलनात गोपाल चव्हाण, अंबिका प्रमोद चव्हाण, निर्मला चव्हाण, वंदना राठोड, संगीता जाधव, लता सोनोने, सुमन डाबेराव, मीना चोपडे, सविता कदम, पुष्पा सोळंके, मंगला डाबेराव, लता डाबेराव, शोभा घोपे, महादेव चाेपडे, कामिना ठाकरे, जगन्नाथ खराटे, शंकर वाकोडे, गोवर्धन वाकोडे, ज्ञानेश्वर सोळंके, गणेश सोळंके, रिपाइं आंबेडकर गटाच्यावतीने आयोजित आंदोलनात घाटपुरी आणि परिसरातील मातृशक्तीने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.यावेळी शासनाच्या गरीब विरोधी धोरणाचा तीव्र निषेधही करण्यात आला.