खाद्यतेलाचे भाव वाढल्याने गृृृृहिणींचे बजेट कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:32 AM2021-03-25T04:32:49+5:302021-03-25T04:32:49+5:30
मागील आठवडाभरापासून तेलाच्या किमती वाढत आहेत. कोरोनामुळे अनेकांची नोकरी गेली. अनेकांचा व्यवसाय डबघाईस आल्याने ओढाताण करून जीवन कंठीत ...
मागील आठवडाभरापासून तेलाच्या किमती वाढत आहेत. कोरोनामुळे अनेकांची नोकरी गेली. अनेकांचा व्यवसाय डबघाईस आल्याने ओढाताण करून जीवन कंठीत आहेत. त्यातच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने महिलांना स्वयंपाकाची घडी बसविण्यासाठी मोठी अडचण जात आहे. आठवडाभरापूर्वी सोयाबीन तेल किरकोळ बाजारपेठेत १२० रुपये होते. मात्र, आता त्यामध्ये १५ रुपयांची वाढ झाल्याने १३५ रुपयांवर पोहोचले आहे. पामतेल १२५ रुपये प्रतिलीटर, आरबी १२५ रुपये, फल्ली तेल १६०, सूर्यफूल १६५ रुपये प्रतिकिलो विक्री केले जात आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
साखर स्थिर, तर डाळीमध्ये चार ते पाच रुपयांची वाढ
मागील महिनाभरापासून साखरेचे दर ३६ रुपये किलो स्थिर आहेत, तर डाळीच्या दरामध्ये चार ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत तूरडाळ शंभर ते ११० रुपये किलो, चणाडाळ ७० ते ८० रुपये, मसूर ७० ते ८०, मूगमोगर १०० ते ११०, मूगडाळ १०० ते ११० रुपये प्रतिकलोने विक्री होत आहे. त्यामुळे दररोजच्या जेवणातील वरण बनवणे कठीण झाले आहे.