नळगंगा नदी हरवते आहे !

By admin | Published: April 16, 2015 12:41 AM2015-04-16T00:41:38+5:302015-04-16T00:41:38+5:30

कधीकाळी मलकापूरातून स्वच्छ वाहणार्‍या नळगंगेला आले गटाराचे स्वरूप.

River Nalganga is defeating! | नळगंगा नदी हरवते आहे !

नळगंगा नदी हरवते आहे !

Next

मनोज पाटील/ मलकापूर: कधीकाळी स्वच्छ पाण्याने खळखळ वाहणारी.. पाण्यात उन्हाने चमचम चमकणारी वाळू..लयबध्द विहरणारे मासे-जलचर जिव..दोन्ही काठावर दाट पसरलेला वृक्षराज..वृक्षांवर कलकलणारे पक्षाचें थवे..अस मनाला प्रसन्न करणार नळगंगा नदीच अगदी देखण रुप. मात्र आज हे सार केवळ कल्पना विस्तारच होऊन बसलं आहे. मानवी चुका व दोषांमुळे नदीला पात्रच उरले नसल्याने मलकापूरातील नळगंगा आता हरवली असल्याचे दुदैवी चित्र स्पष्ट दिसत आहे. घाटावरुन मोताळा-दाताळा मार्गे मलकापूरच्या हद्दीत बोदवड पुलापासून गाडेगाव मंदीर-स्मशानभुमी, मंगलगेट, सालीपुरा, बारादरी, शिवाजी नगर, पारपेठ आदी परिसराला भेदत शहराच्या सिमेवरुन एकेकाळी खळखळून वाहणारी नळगंगा नदी म्हणजे नगरवासीयांची तृष्णा भागवणारी जिवनदायीनी, शहराचे सौदर्य फुलविणारी ही नळगंगा नदी आज केवळ नावालाच उरली आहे. या निर्सगनिर्मित यंत्रणेची मानवी यंत्रणेने काळजी न घेतल्यामुळे नैसर्गीक संपत्तीची ही देणगी काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहे. नदीपात्राच्या हाकेच्या अंतरावरच मानवी वस्ती असून या वस्त्यांचा विस्तारही वाढलेला आहे. या वस्त्यांमधील नागरिकांना नेहमीच दुर्गंंधीयुक्त वातावरण व सरपटणर्‍या जिवांना सामोर जाव लागते. अशा समस्या येथे असून मानवी दोषांमुळे या नदीपात्राची वाट लागल आहे. बदलती परिस्थिती व मानवी चुकांमुळे नदीचा प्रवाह बदलत चालला आहे. प्रवाहाला खिळ बसून बाधा निर्माण झाली आहे. रेती व माती उपशामुळे नदीपात्रात छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. वाळू व जलजीव नामशेष झाले आहेत. नदीचे पात्र कमी-कमी होत चालल्याने नदीला नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. नळगंगेचा हा कोंडलेला श्‍वास भविष्यात वेध घेत मोकळा करणे गरजेचे झाले आहे.

Web Title: River Nalganga is defeating!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.