भोसा येथील आरओ प्लांट बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:33 AM2021-03-20T04:33:35+5:302021-03-20T04:33:35+5:30
मेहकर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या व ७० टक्के आदीवासी बहुल असलेल्या भोसा ग्रामपंचायत अंतर्गत गावातील नागरिकांना शुध्द पाणी मिळावे ...
मेहकर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या व ७० टक्के आदीवासी बहुल असलेल्या भोसा ग्रामपंचायत अंतर्गत गावातील नागरिकांना शुध्द पाणी मिळावे म्हणुन पाणी फील्टर आरो प्लॅन्ट बसविण्यात आलेला आहे. जवळपास चार लाख रुपये खर्च करुन हा आरओ प्लॅन्ट बसविण्यात आलेला आहे. या पाणी फिल्टर आरो मधुन १५ दिवस शुध्द पाणी भोसा गावाला मिळाले नाही. यावरुन या पाणी फिल्टरचे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले हे स्पष्ट होते. ग्रामपंचायतचे याकडे पुर्णपणे दुर्लक्ष असुन भोसा गावात चार महिण्यात चार ग्रामसेवक बदलेले असुन सध्या कार्यरत असलेले ग्रामसेवक आर. जी. कृपाळ हे महीन्यातुन एकदाच येतात. या आदीवासीबहुल गावाकडे गटविकास अधिकारी आशिष पवार यांचे पुर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. या पुर्वी सुध्दा भोसा ग्रामपंचायतमध्ये तीन लाख रुपयांच्या विकास कामात अपहार झालेला आहे. तीन लाख रुपयाची रक्कम सुध्दा अद्याप वसुल केलेली नाही. निकृष्ठ दर्जाच्या पाणी फिल्टरचे कोणतेही टेंंडर काढलेले नाही. पाणी फिल्टर आरोसोबत आणलेल्या वॉटर कॅन सुध्दा गायब आहेत.
चौकशी करण्याच्या सूचना
भोसा गावातील पाणी फिल्टर आरो बाबत झालेल्या भ्रष्टाचारा बाबत जिल्हा परिषद सी. ई. ओ. भाग्यश्री विसपुते यांच्याशी संपर्क केला असता संबंधीत प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आदीवासी बहुल गाव असलेल्या भोसा गावातील नागरिकांना आरओ प्लान्ट असूनही अशुध्द पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.