आरओ प्लांट घोटाळा प्रकरण : अपहाराची रक्कम वेतनातून वसूल केली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 06:14 PM2020-02-28T18:14:20+5:302020-02-28T18:14:42+5:30

१२ गावात अद्याप आर.ओ.प्लांट लागले नसल्याची बाब सर्वप्रथम  लोकमतने उघड केली होती.

RO Plant Scam Case: The amount will be recovered from salary | आरओ प्लांट घोटाळा प्रकरण : अपहाराची रक्कम वेतनातून वसूल केली जाणार

आरओ प्लांट घोटाळा प्रकरण : अपहाराची रक्कम वेतनातून वसूल केली जाणार

Next

- योगेश फरपट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :  आर.ओ.प्लांट प्रकरणात तत्कालीन गटविकास अधिकारी के.डी.शिंदे, विस्तार अधिकारी ए.जी.राठोड यांच्यासह १० ग्रामसेवक दोषी आढळले आहेत. याप्रकरणी गटविकास अधिकारी के.डी.शिंदे यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठवला आहे. तर १० पैकी ९ ग्रामसेवकांच्या पगारातून अपहाराची रक्कम वसूल करण्यात यावी असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जि.प.पंचायत विभागामार्फत विद्यमान गटविकास अधिकारी यांनी दिले आहेत. लोकमतने नोव्हेंबरमध्ये उघड केलेल्या आर.ओ.प्लांट घोटाळ््याप्रकरणी अखेर जिल्हाप्रशासनाने कारवाई केली हे विशेष. 
खामगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीमध्ये चौदाव्या वित्त आयोगातून नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे. या हेतूने आर.ओ.प्लांट बसविण्याचे नियोजन २०१८ मध्ये करण्यात आले. नागरिकांनाही शुद्ध पाण्याची व्यवस्था उपलब्ध होवू शकेल या सकारात्मक हेतूने सरपंचांनी सुद्धा प्रस््तावाला मान्यता दिली. त्यानुसार आर.ओ. प्लांटचे २ लाख ९९ हजार ५०० रुपयाचा निधी संबधित ग्रामपंचायतच्या बँक खात्यातून ११ व १२ फेब्रुवारी २०१७ रोजी कपात सुद्धा झाला. मात्र अद्याप १२ पैकी एकाही गावात आर.ओ.प्लांट लावण्यात आले नाहीत. १२ गावात अद्याप आर.ओ.प्लांट लागले नसल्याची बाब सर्वप्रथम  लोकमतने उघड केली होती. प्रकरणाच्या मुळाशी जावून यातील बारकावे मांडण्यात आले होते. गणेशपूर कुंभेफळ जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्या रेखा चंद्रशेखर महाले यांनी ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ही बाब निदर्शनास आणून देत तक्रार दाखल केली होती. त्यानुषंगाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) मार्फत सखोल चौकशी झाली. त्यात लोणीगुरव, निरोड, अंत्रज, पिंप्री धनगर, हिवराखुर्द, झोडगा, पिंप्री कोरडे, टाकळी तलाव, भंडारी, बोरजवळा येथील ग्रामसेवक चौकशीत दोषी आढळले असून त्यांनी अपहार केल्याचे मान्य सुद्धा केले आहे. याचप्रकरणात पहिल्याच झटक्यात खामगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए.जी.राठोड हे निलंबीत झाले होते. त्यानंतर आता तत्कालीन गटविकास अधिकारी के.डी.शिंदे हे सुद्धा प्रथमदर्शनी दोषी आढळल्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. 


बिडीओ के.डी.शिंदेंविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव! 
खामगाव पंचायत समितीअंतर्गत ग्रामपंचायतीने केलेल्या आर.ओ.प्लाँट घोटाळा प्रकरणात तत्कालीन गटविकास अधिकारी के.डी..शिंदे हे सुद्धा दोषी आढळले आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. 
या ग्रामसेवकांनी केले आरोप मान्य 
आर.ओ.प्लांट घोटाळा प्रकरणात विस्तार अधिकारी ए.जी.राठोड यांच्यसह ग्रामसेवक एस.जे.वानखेडे (लोणीगुरव), पि.एस.आपोतीकर (निरोड), एस.जी.जोशी (अंत्रज), ए.एन.काकडे (पिंप्री धनगर), कु.जि.एम.चव्हाण (हिवराखुर्द), सि.एम.जाधव (झोडगा), कु. एल.एस.मोरे (पिंप्री कोरडे), व्हि.जी.गिºहे (टाकळी तलाव), कु.एस.पी.क्षिरसागर (भंडारी,बोरजवळा) या ग्रामसेवकांनी आरोप मान्य केले आहेत. त्यांची एका वषार्साठी वेतनवाढ रोखण्यात आली आहे. तर शेलोडी ग्रामसेवक बि.डी.धांडगे यांची सेवानिवृत्ती झाल्याने त्यांची वेतनवाढ रोखण्यात येणार नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. 


खामगाव तालुक्यातील आर.ओ.प्लांट घोटाळयाप्रकरणी ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. अपहाराच्या रक्कम वसूलीची पुढील कारवाई खामगाव गटविकास अधिकारी करणार आहेत. 
- राजेश लोखंडे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.बुलडाणा


ग्रामसेवकांनी आर.ओ.प्लांट खरेदी अपहार केल्याचे मान्य करूनही प्रशासनाने त्यांचे निलंबन न करता थातूरमातूर कारवाई केली आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांकेड दाद मागणार आहे. 
- रेखा चंद्रशेखर महाले, 
जिल्हा परिषद सदस्य, गणेशपूर-कुंभेफळ सर्कल.

Web Title: RO Plant Scam Case: The amount will be recovered from salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.