आर.ओ. घोटाळा प्रकरणात ग्रामसेवकांवर कारवाईस टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 01:42 PM2018-11-30T13:42:33+5:302018-11-30T13:43:14+5:30

खामगाव : खामगाव तालुक्यातील  आर.ओ. घोटाळा प्रकरणात प्रथमदर्शनी ग्रामसेवक दोषी आढळले असतानाही अद्याप त्यांच्यावर कारवाईस जिल्हा परिषद प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचे वास्तव आहे.

R.O. scam case, avoiding action on Gram Sevak in buldhana district | आर.ओ. घोटाळा प्रकरणात ग्रामसेवकांवर कारवाईस टाळाटाळ

आर.ओ. घोटाळा प्रकरणात ग्रामसेवकांवर कारवाईस टाळाटाळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : खामगाव तालुक्यातील  आर.ओ. घोटाळा प्रकरणात प्रथमदर्शनी ग्रामसेवक दोषी आढळले असतानाही अद्याप त्यांच्यावर कारवाईस जिल्हा परिषद प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचे वास्तव आहे. तर विस्तार अधिकारी निलंबीत होवून आठवडा उलटला तरी अद्याप १२ पैकी एकाही गावातील ग्रामसेवकावर कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसून येते. 
खामगाव तालुक्यातील १२ गावात  आर.ओ.प्लांट बसविण्याचे नियोजन गेल्या वर्षी करण्यात आले होते. आर.ओ. प्लांटचे २ लाख ९९ हजार ५०० रुपयाचा निधी संबधित ग्रामपंचायतच्या बँक खात्यातून ११ व १२ फेब्रुवारी २०१७ रोजी कपात सुद्धा झाला.  मात्र अद्याप एकाही गावात आर.ओ. प्लांट लागले नसल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर या प्रकरणाची तक्रार गणेशपूर कुंभेफळ जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्या रेखा चंद्रशेखर महाले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय चोपडे यांनी खामगाव तालुक्यातील माटरगाव, गेरू, बोरजवळा, भंडारी, झोडगा, पिंप्री कोरडे, निरोड, लोणी गुरव, पिंप्री धनगर, टाकळी, हिवरा खुर्द, अंत्रज, शेलोडी आदी गावांना भेटी देवून चौकशी केली. त्यासोबतच ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावरही चौकशीची स्वतंत्र जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र त्यांनी अद्याप त्याला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पाठवला नाही. त्यामुळे ग्रामसेवकावर कारवाईस विलंब होत आहे.

Web Title: R.O. scam case, avoiding action on Gram Sevak in buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.