गिट्टी नेणाऱ्या वाहनामुळे रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:33 AM2021-03-19T04:33:56+5:302021-03-19T04:33:56+5:30
या मार्गाला गिट्टी वाहून नेणाऱ्या अवजड वाहनामुळे मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ...
या मार्गाला गिट्टी वाहून नेणाऱ्या अवजड वाहनामुळे मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बुलडाणा-ते रायपूर मार्गावर प्रवास करणे म्हणजे एक तारेवरची कसरत बनली आहे. सैलानी-रायपूर ते बुलडाणा या मार्गावर असलेल्या खदानीतून गिट्टी नेणाऱ्या अवजड वाहनामुळे हा रस्ता खराब झाला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रस्त्यावर बारीक दगड व जागोजागी खड्डे यामुळे दुचाकी वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे १८ मार्च रोजी सकाळी या मार्गावर रास्ता रोको करून रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात निलेश राजपूत, मो . साबीर, भरत फोलाने, रमेश देशमुख, संदीप कांबले, सुधाकर तायडे, पांग्रीचे सरपंच संजय उबरहंडे, नितीन राजपूत (चिखली)व ग्रामस्थ सहभागी झाले होते. रायपूर, वाडी पांग्रीसह परिसरातील ग्रामस्थांनी हे आंदोलन केले.