रस्त्याची दुरवस्था, वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:35 AM2021-07-27T04:35:48+5:302021-07-27T04:35:48+5:30
पाझर तलावाची दुरुस्ती करण्याची मागणी चिखली : देखभाल दुरुस्तीअभावी तीस वर्षांपूर्वीचा आमखेडचा पाझर तलाव फुटला हाेता़ यामुळे शेकडो ...
पाझर तलावाची दुरुस्ती करण्याची मागणी
चिखली : देखभाल दुरुस्तीअभावी तीस वर्षांपूर्वीचा आमखेडचा पाझर तलाव फुटला हाेता़ यामुळे शेकडो हेक्टर शेती खरडून गेली. या तलावाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे़
लसीकरणाविषयी मार्गदर्शन
माेताळा : कोरोना लसीबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी शिक्षक व मुख्याध्यापकांच्या वतीने ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कुटुंब सर्वेक्षण अनुप्रिता व्याळेकर, सुनीता हुडेकर, वामिंद्रा गजभिये, सीमा गोरे यांनी केले.
सुलतानपूर-वेणी रस्त्याची दुरवस्था
सुलतानपूर : येथून जवळच असलेल्या सुलतानपूर-वेणी रस्त्याची पहिल्याच पावसाने दुरवस्था झाली आहे. पहिल्या पावसामध्येच हा रस्ता संपूर्णपणे चिखलमय झाला असून, वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
केशव नगरात घरफाेडी, ऐवज लंपास
बुलडाणा : घरमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. यावेळी चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण तब्बल ३ लाख ६४ हजार रुपयांचा माल लंपास केला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे.
पळसखेड सपकाळ येथे रक्तदान शिबीर
चिखली : श्री गुरुदेव आश्रम पळसखेड सपकाळ येथे २२ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने आश्रमाच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले.
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान
लाेणार : मागील तीन ते चार दिवसांपासून तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. या पुराचे पाणी रायगाव, टिटवी, धाड यासह इतर गावातील शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याने शेकडो हेक्टर शेती खरडून गेली आहे.