डाेणगावात रस्ता सुरक्षा अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:32 AM2021-02-07T04:32:09+5:302021-02-07T04:32:09+5:30
डोणगांव : पोलीस स्टेशनअंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला. पाेलिसांनी ...
डोणगांव : पोलीस स्टेशनअंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला. पाेलिसांनी ६ फेब्रुवारी राेजी वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करून २० जणांना समज देऊन साेडले.
ठाणेदार दीपक पवार, वाहतूक पोलीस खडसे व विकास राऊत, पीएसआय शिवाजी राठोड, एएसआय अशोक नरोटे, गजानन काकड, नितिन खराडे, अंभोरे यांनी वाहनधारकांना थांबवून कागदपत्रे तपासली, तसेच २० अल्पवयीन मुलांना वाहनासह पोलीस स्टेशनला बोलावून त्यांना वाहतुकीचे नियम सांगण्यात आले, तसेच त्यांच्या पालकांना बोलावून अल्पवयीन मुलांना दुचाकी न देण्याची समज देण्यात आली. यापुढे अल्पवयीन मुले दुचाकी घेऊन रस्त्यावर दिसल्यास कारवाई करण्यात येईल आणि फॅन्सी नंबर प्लेट व कागदपत्रे नसणाऱ्यांवर यानंतर कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले.
डोणगांव येथे अल्पवयीन मुलांना पालक दुचाकी देत असल्याने, मुले भरधाव वेगाने वाहन चालवून रस्ता नियमांचे उल्लंघन करतात. अशांविरुद्ध डोणगांव येथे दररोज कारवाई करण्यात येईल. त्यामुळे पालकांनी आपली दुचाकी चालविण्यासाठी देऊ नये.
दीपक पवार ठाणेदार डोणगांव