तीर्थक्षेत्रांचे रस्ते झाले बकाल
By Admin | Published: July 10, 2014 11:16 PM2014-07-10T23:16:35+5:302014-07-10T23:16:35+5:30
पळशी सुपो रस्ता क्षतिग्रस्त
जळगाव जामोद : तालुक्यातील तिर्थक्षेत्रांच्या रस्त्यांना अवकळा आली असून सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसुन येते. पळशी सुपो येथे जाताना सुलज गावाजवळ रोडच्या कडेला मोठे भगदाड पडले असून त्या लगत मोठी झुडपे वाढली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना हा खड्डा जवळ जाईपर्यंंत दिसत नाही. त्यामुळे येथे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यात पळशी सुपोचे सुपोजी महाराज, धानोरा महासिध्द महाराज, सुनगाव आवजी सिध्द महाराज, चावरा इलोरा सखाराम महाराज तर जामोद येथे बेंबळेश्वर आणि जैन मंदीर अशी प्रसिध्द तिर्थक्षेत्र आहेत. नेहमी वर्दळीत असणारा एखादा रस्ता वगळता इतर सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. पळशी सुपो येथे दर रविवारी दर्शनाला जाणार्या भक्तांची संख्या मोठी असते. संपुर्ण जिल्ह्यातून भाविक येथे दर्शनाला येतात आमदार, खासदारासह मोठमोठे राजकीय नेते सुपो महाराजांचे दर्शनाला येतात. परंतु या तिर्थक्षेत्राच्या रस्त्याचा प्रश्न अजुनही सुटू नये ही शोकांतिका आहे. लाखोच्या संख्येत जेथे भाविक दर्शनाला जातात. लाखो वाहने या रस्त्याने धावतात. मात्र संबंधित विभाग या भागात अनभिज्ञच दिसतो. वास्तविक येथे दुपदरी आणि खड्डे विरहीत रस्ता असावा. परंतु मोठे भगदाड पडूनही कुणी दखल घेत नाही. त्यामुळे भक्तांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तर रस्त्यामध्ये सुध्दा मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना कसरत करत वाहन न्यावे लागते. तेव्हा सदर रस्ता दुपदरी करून त्याचे चांगल्या दर्जाचे डांबरीकरण असावे, अशी येथे जाणार्या भक्तांची अपेक्षा आहे. ** भक्त मोठ-मोठे पण. सुपो महाराजांवर श्रद्धा असणारे अनेक भक्त या तालुक्यात आहेत. त्यांचे राजकीय वजनही कमी नाही. प्रत्येक शुभकार्याची सुरूवात ते महाराजांच्या दर्शनाशिवाय करत नाही. त्यामध्ये माजी कृउबास सभापती ओंकारसेठ राठी, अशोकसेठ दैय्या, मनसे जिल्हाप्रमुख गजानन वाघ, माजी नगराध्यक्ष तथा भाजपा कार्यकारणी सदस्या अनिताताई जयस्वाल, अनिल जयस्वाल, संजय इंगळे इत्यादींचा समावेश आहे. मात्र या मंडळीमधून या रस्त्याबद्दल कधी आवाज उठविला जात नाही. हे दुर्देवच म्हणावे लागेल.