कृषी केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:24 AM2021-07-02T04:24:16+5:302021-07-02T04:24:16+5:30
येथील एका कृषी केंद्र संचालकांकडून सोयाबीनची मनमानी दराने विक्री केली जात आहे. कृषी केंद्रातून एका कंपनीच्या सोयाबीनची बॅग ...
येथील एका कृषी केंद्र संचालकांकडून सोयाबीनची मनमानी दराने विक्री केली जात आहे. कृषी केंद्रातून एका कंपनीच्या सोयाबीनची बॅग विक्री तीन हजार ४५० रुपये असून कंपनीने तसे बॅगवर नमूद सुद्धा केलेले आहे. मात्र, कृषी केंद्र संचालकाकडून ३ हजार ६०० रुपयाने विक्री करून शेतकऱ्याची लूट केली जात आहे. बॅगसोबत काहीही घेतले नाही, तरी दुसरे काहीतरी वस्तू बिलात टाकून ती शेतकऱ्याला न देता अधिक १५० रुपये करून तीन हजार सहाशे रुपयांची जुळवाजुळव करून बिले दिली जात आहेत. यासंदर्भात काही शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या असून तक्रारीसोबत कृषी केंद्र चालकाचे बिल व सोयाबीन कंपनीचे लेबल दिलेले आहे. याची सखोल चौकशी करून कृषी संचालकावर कारवाई करून अशा कृषी केंद्राचा परवाना रद्द करावा, अन्यथा ५ जुलै रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे.