वाघजाळ येथे दराेडा, कुटुंबास मारहाण करून ९० हजारांचा एवज लंपास

By संदीप वानखेडे | Published: December 16, 2023 12:29 PM2023-12-16T12:29:24+5:302023-12-16T12:30:12+5:30

चाेरट्यांच्या मारहाणीत पती, पत्नीसह मुलगा गंभीर जखमी.

robbery in waghjai motala buldhana the family beaten and looted 90 thousand | वाघजाळ येथे दराेडा, कुटुंबास मारहाण करून ९० हजारांचा एवज लंपास

वाघजाळ येथे दराेडा, कुटुंबास मारहाण करून ९० हजारांचा एवज लंपास

संदीप वानखडे, मोताळा : तालुक्यातील वाघजाळ(टाकळी) येथे चार दराेडेखाेरांनी एका कुटुंबाला मारहाण करून ९० हजारांपेक्षा जास्त एवज लंपास केला़ स्प्रिंकलरच्या पाईपने बेदम मारहाण केल्याने पती, पत्नीसह मुलगा गंभीर जखमी झाला़ ही घटना १५ डिसेंबरच्या रात्री १ ते १़ ३०च्या सुमारास घडली़ या घटनेमुळे वाघजाळसह परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे़

मलकापूर-बुलढाणा रोडवरील वाघजाळ फाट्यापासून अर्धा कि.मी.अंतरावर असलेल्या वाघजाळ येथे चार दरोडेखोरांनी आजुबाजुच्या परिसरातील दरवाजाच्या कडी-कोंडा लावला़ सागर शिंबरे यांच्या घराचे समोरील दरवाजाची कडी लावून घराच्या मागील दरवाजाची कडी तोडून घरामध्ये प्रवेश केला. दरोडेखोरांनी घरामध्ये प्रवेश करीत सागर किसना शिंबरे (वय ३५), सोनल सागर शिंबरे (वय ३०), सार्थक सागर शिंबरे यांना स्प्रिंकलरच्या नळ्यांनी बांधून बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये सोनल शिंबरे यांचा हात फॅक्चर झाला तर सागर शिंबरे यांचा पाय फॅक्चर झाला. दरोडेखोरांनी सोनल शिंबरे यांच्या अंगावरील व कपाटातील सोन्याचे दागीणे व नगदी १८ हजार रुपये असा ९० हजारांचा एवज लंपास केला़ घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेवून दरोडेखोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सागर शिंबरे व सोनल शिंबरे यांना बुलढाणा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले़

खामगाव अप्पर पोलिस अधिक्षकांची घटनास्थळी भेट

घटनेची माहिती मिळताच खामगाव अप्पर पोलिस अधिक्षक अशोक थोरात, बुलढाणा उपविभागीय पोलिस अधिकारी गुलाबराव वाघ, बोराखेडी पोलिस निरीक्षक बळीराम गिते, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांनी १६ डिसेबरच्या सकाळी ७ वाजता घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

डॉग स्कॉडला पाचारण

घटनेची गंभीरता पाहता पोलिस प्रशासनाने डॉग स्कॉट राणीला पाचारण करण्यात आले होते. राणीला घेवून पोहेकाँ.बबन जाधव, हवालदार विलास पवार घेवून आले होते. परंतु चोरट्यांनी कोणत्याही प्रकारचे पुरावे सोडले नसल्याने राणीला चोरट्याचा माग घेता आला नाही. यामुळे पोलिसांपेक्षा चोरट्यांचे नेटवर्क नेहमीप्रमाणे पावर फुल्ल निघाल्याची चर्चा आहे.

Web Title: robbery in waghjai motala buldhana the family beaten and looted 90 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.