रोहीचा विहिरीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:30 AM2021-04-05T04:30:51+5:302021-04-05T04:30:51+5:30

साखरखेर्डा, शेंदुर्जन, मेरा बु. या सर्कल मध्ये वन विभागाच्या शेकडो हेक्टर जमिनी असून या जंगलात रोही, हरीण, रानडुक्कर, सांबर, ...

Rohi falls into a well and dies | रोहीचा विहिरीत पडून मृत्यू

रोहीचा विहिरीत पडून मृत्यू

Next

साखरखेर्डा, शेंदुर्जन, मेरा बु. या सर्कल मध्ये वन विभागाच्या शेकडो हेक्टर जमिनी असून या जंगलात रोही, हरीण, रानडुक्कर, सांबर, चितळ नीलगाय, अस्वल, लांडगे, कोल्हे हे प्राणी प्रामुख्याने आढळून येतात. हरीण, रानडुक्कर, सांबर आणि रोही या प्राण्यांचे कळपच्या कळप दिसून येतात. रात्री शेतात जाऊन कांदा, ऊस, फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. दरम्यान, ३ एप्रिल रोजी रात्री रोहीचा एक कळप शिंदी शिवारात फिरत असताना त्या कळपातील एक रोही पंजाबराव तोडे यांच्या विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी पंजाबराव तोडे हे शेतात गेल्यानंतर ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने ही माहिती वनविभागाला दिली. मेहकरचे वनपाल राजेंद्र शेळके यांनी कामगारांच्या मदतीने मृत रोहीस बाहेर काढले. पंचनामा करून त्या रोहिवर अंतिम संस्कार केले.

Web Title: Rohi falls into a well and dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.