काम मिळत नसल्याने रोहयो मजुरांची उपासमार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:35 AM2021-09-19T04:35:51+5:302021-09-19T04:35:51+5:30

चिखली : ‘मागेल त्याला काम’, अशी हमी असलेल्या म.ग्रा. रोजगार हमी योजनेच्या तालुक्यातील मजुरांच्या हाताला १ ऑगस्टपासून मात्र कामच ...

Rohyo workers starve due to lack of work! | काम मिळत नसल्याने रोहयो मजुरांची उपासमार!

काम मिळत नसल्याने रोहयो मजुरांची उपासमार!

Next

चिखली : ‘मागेल त्याला काम’, अशी हमी असलेल्या म.ग्रा. रोजगार हमी योजनेच्या तालुक्यातील मजुरांच्या हाताला १ ऑगस्टपासून मात्र कामच मिळेनासे झाले आहे. परिणामी, रोजंदारीवर पोट असलेल्यांची चूलच पेटत नसल्याने आम्ही जगायचे कसे, असा सवाल उपस्थित करताना संबंधित विभागाकडून आर्थिक लुबाडणुकीचे प्रकार होत असल्याचा गंभीर आरोप तालुक्यतील सुमारे ४० रोहयो मजुरांनी केला आहे.

रोजगार हमी योजनेतील तालुक्यातील मजुरांना गत १ ऑगस्टपासून काम मिळलेले नाही. याबाबत गणेश देशमुख यांनी सुमारे ४० मजुरांच्या स्वाक्षरीनिशी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने कामाची मागणी करण्यासाठी संबंधित गावातील रोजगार सेवक टाळाटाळ करतात. याबाबत तहसीलमधील रोहयो कार्यालयाकडे धाव घेतली असता हे कार्यालयदेखील गत दीड महिन्यापासून बंद असल्याने कुचंबणा होत आहे. दरम्यान, रोजगार सेवकांकडून चार हप्त्यांपैकी एका हप्त्याची रक्कम द्या, अशा प्रकारची मागणी होत आहे, तसेच जॉब कार्ड बनविण्यासाठीदेखील प्रत्येकी एक हजार रुपयांची मागणी होत असल्याचा गंभीर आरोप या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. दरम्यान, या योजनेतील मजुरांमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील, तसेच विधवा, निराधारांचा समावेश असून, गत दीड महिन्यापासून हाताला काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली असल्याने तातडीने याबाबत कारवाई करावी, तसेच नियमित काम उपलब्ध करून द्यावे; अन्यथा आमच्या आत्महत्येस पूर्णपणे शासन जबाबदार राहील, असा इशारा गणेश देशमुख यांनी दिला आहे. या निवेदनावर सुमारे ४० मजुरांची स्वाक्षरी आहे.

Web Title: Rohyo workers starve due to lack of work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.