पाल्याच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची- रामचंद्र पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 02:28 PM2020-02-19T14:28:15+5:302020-02-19T14:28:25+5:30
पालकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपदान शिवव्याख्याते प्रा. रामचंद्र पाटील यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पाल्याच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. संपत्ती सांभाळण्यासाठी अपत्य निर्माण करण्यापेक्षा वैचारारिक, बौद्धिक आणि प्रगल्भ व सजग समाज निर्मीतीसाठी योगदान देणारे अपत्य निर्माण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपदान शिवव्याख्याते प्रा. रामचंद्र पाटील यांनी येथे केले.
‘शिव चरित्र व आजचा युवक’ या विषयावर स्थानिक गांधी भवनामध्ये १७ फेब्रुवारी रोजी आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. जयश्री शेळके होते. उद्घाटक म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ, आ. संजय गायकवाड, शिक्षणाधिकारी श्रीराम पानझडे, शिवजयंती उत्सव समितीच्या अॅड. जयश्री देशमुख निमंत्रक सुनील सपकाळ, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण जैन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रा. रामचंद्र पाटील यांनी शिवचरित्राची महती विषद करतानाच वर्तमानत पालकत्वाची भूमिका एक सुजाण पाल्य घडविण्यासाठी शिवचरित्र किती महत्त्वाचे आहे हे विविध उदाहरणांनी पडवून दिले. शहाजी महाराजांची तलवार, माँ जिजाऊंची वाणी आणि त्यातून घडलेले छत्रपती शिवाजी महाराज याचे अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी यावेळी केली. हाच धागा पकडून त्यांनी वर्तमान स्थितीवर बोट ठेवत पालकत्वाची कणखर भूमिका किती महत्वाची आहे, याची उपस्थि जनसमुदायाला जाणिव करून दिली. दरम्यान, इतिहास विसणारे गुलामीके वळतात, असे सांगत प्रगल्भ इतिहासाचा वारसा बुलडाणा जिल्ह्याला मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या माँ जिजाऊंचा हा जिल्हा आहे. त्यांनी दिलेल्या समतेचा आदर्श ठेवून प्रत्येक घटकाला सोबतच घेऊन बुलडाणा जिल्हा सध्या वाटचाल करत आहे, असे ते म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांचीही समयोचित भाषणे झाली. (प्रतिनिधी)